दुबई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 101 धावांनी विजय साजरा केला. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने झळकावलेले शतक भारतीय डावाचे वैशिष्ट्य राहिले. तब्बल 1020 दिवसांनी विराटने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. या शतकासह विराटने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, वर्तमान क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट तोच आहे.
जवळपास 2 वर्ष व 10 महिन्यांच्या या कालावधीत चाहते त्याच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, सातत्याने हे शतक विराटला हुलकावणी देत आलेले. अखेर अफगाणिस्तानविरुद्ध शतक पूर्ण होताच, त्याच्या शतकांची संख्या 71 झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सचिनने शतकांचे शतक पूर्ण केलेले. आता विराट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे.
सध्या वर्तमान क्रिकेटचा विचार केल्यास जे खेळाडू सक्रिय क्रिकेट खेळत आहेत, त्यातील एकही खेळाडू शतकांच्या बाबतीत विराटच्या आसपासही नाही. विराटने 43 वनडे व 27 कसोटी शतके झळकावली आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा जो रूट असून, त्याच्या नावे 44 शतके आहेत. रूट सध्या केवळ कसोटी क्रिकेट खेळत असल्याने, तो विराटच्या आकड्यापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य आहे. 43 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर व 41 शतकांसह चौथ्या क्रमांकावर असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा हे वयाच्या पस्तीशीत असल्याने आणखी दोन-तीन वर्ष खेळू शकतात. या कालावधीत त्यांना इतका मोठा टप्पा गाठणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत विराटला कोणीही स्पर्धक नसल्याचे दिसून येते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक
टीकेला चोख प्रत्युत्तर देत भुवीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कामगिरी; चहल-बुमराहचे विक्रम इतिहासजमा
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे