मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चालू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी फारच सुमार झाली. त्यामुळे त्यांनी ३२ वर्षांनंतर एक नकोसा विक्रमही केला आहे.
मेलबर्नला झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद १९५ धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशानेने सर्वोच्च ४८ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात २०० धावांवर ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद झाला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून युवा कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. म्हणजेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून एकाही क्रिकेटपटूला ५० धावाही करता आल्या नाहीत.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत सन १९८८ नंतर असे पहिल्यांदाच घडले की घरच्या मैदानात कसोटी सामना खेळताना एकाही क्रिकेटपटूला अर्धशतक करता आले नाही. यापूर्वी ३२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध मेलबर्न येथेच झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही क्रिकेटपटूला अर्धशतक करता आले नव्हते.
विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटचा दर्जा असणाऱ्या प्रमुख संघांना किमान एकदातरी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.
घरच्या मैदानावर संघातील एकाही क्रिकेटपटूला अर्धशतक झळकावता न आलेले शेवटचे कसोटी सामने –
वेस्ट इंडिज – २०१९
बांगलादेश – २०१८
श्रीलंका – २०१७
दक्षि आफ्रिका – २०१६
भारत – २०१५
झिम्बाब्वे – २००५
पाकिस्तान – २००२ (युएई)
न्यूझीलंड – २००२
इंग्लंड – २०००
ऑस्ट्रेलिया – २०२०*
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी
व्वा रे सिराज! भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात ‘असा’ पराक्रम करणारा दुसराच
शानदार शुभमन! आशिया बाहेर पदार्पण करताना ‘अशी’ कामगिरी करणारा केवळ चौथाच भारतीय सलामीवीर