न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ अंतिम चरणात पोहोचला आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
ख्राइस्टचर्चच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात (INDW vs SAW) २७५ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारतीय संघ विजयाच्या अतिशय नजीक पोहोचला होता. परंतु एका नो बॉलमुळे सामना फिरला (No Ball) आणि दक्षिण आफ्रिकेने भारताचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न मोडले.
भारतीय संघाची गोलंदाज दिप्ती शर्मा हिने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची सेट झालेली फलंदाज मिग्नॉज डू प्रीज हिला हरमनप्रीत कौरच्या हातून झेलबाद केले होते. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या केवळ खालच्या फळीतील फलंदाज बाद व्हायच्या बाकी होत्या आणि त्यांना विजयासाठी एका चेंडूत ३ धावा करायच्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत होता.
It wasn't just the no ball which cost India the game today but sometimes an inch costs moments that takes decades to achieve and are possibly once in a lifetime achievement for many players. Disappointing end to India's campaign #IndvSA #cwc22 pic.twitter.com/2DzerovJD1
— Virender Sehwag (@virendersehwag) March 27, 2022
परंतु तिसऱ्या पंचांनी पुन्हा एकदा दिप्तीने फेकलेला चेंडू तपासला आणि तो नो बॉल निघाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला जीवनदान मिळाले आणि एक अतिरिक्त धाव व अतिरिक्त चेंडूही खेळायला मिळाला. परिणामी शिल्लक २ चेंडूंवर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्य पूर्ण केले आणि ३ विकेट्स राखून सामनाही (SAW Beat INDW) जिंकला.
Nothing hurts Indian cricket more than a no ball. 💔
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 27, 2022
नो बॉल भारतीय संघासाठी राहिलाय अनलकी
महत्त्वाचे म्हणजे, नो बॉलमुळे भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेतील बाद फेरी सामना (ICC Tournament Knock-Out Matches) गमावणे नवीन नाही. यापूर्वीही एका नो बॉलमुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांनी हृदये तुटली आहेत.
यापूर्वी २०१७ मध्ये चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाकिस्तानच्या फखर जमानची विकेट घेतली होती. परंतु नंतर तो चेंडू नो बॉल निघाला होता. ज्यामुळे शतकवीर फखर जमानला जीवनदान मिळाले होते आणि त्याने संघाला मोठा विजयही मिळवून दिला होता. भारताने तो महत्त्वपूर्ण सामना १८० धावांनी गमावला होता.
No Ball in the knockout game of an ICC tournament 💔#INDvSA #Cricket #CWC22 #NOBall pic.twitter.com/vAt6xeovWT
— Wisden India (@WisdenIndia) March 27, 2022
तसेच २०१६ सालच्या टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतही नो बॉलमुळे भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात आर अश्विन आणि हार्दिक पंड्या यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नो बॉल टाकले होते. जे सामन्याअंती भारतीय संघाच्या पराभवाचे कारण ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनीने कर्णधारपद सोडल्याचे आश्चर्य वाटले नाही, कारण…’, डिविलियर्सने दिली मोठी प्रतिक्रिया
धोनीची आक्रमक फलंदाजी पाहून श्रेयस अय्यरला आलेलं टेंशन, सामन्यानंतर म्हणाला…