कालपासून(14 फेब्रुवारी) न्यूझीलंड एकादश विरुद्ध भारत संघात तीन दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सराव सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या डावास खास कामगिरी केली नाही. भारताला पहिल्या डावात केवळ 263 धावाच करता आल्या. यामध्येही चेतेश्वर पुजाराच्या 93 धावांच्या आणि हनुमा विहारीच्या 101 धावांच्या खेळीचा समावेश आहे.
या डावात या दोघांव्यतिरिक्त भारताच्या वरच्या फळीतील फलंजाद मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेले मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉने स्कॉट कुग्लेइजेनच्या गोलंदाजीवर सुरुवातीलाच विकेट गमावल्या.
शॉ शून्य धावेवर तर अगरवाल 1 धाव करुन झेलबाद झाले. अगरवाल बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच चेंडूवर शुबमन गिलही शून्यावर बाद झाला. अखेर पुजारा आणि विहारीने भारताचा डाव सावरत 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.
त्यामुळे शतकी खेळी करणारा विहारी पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना म्हणाला, तो संघ व्यवस्थापन सांगेल त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सराव सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विहारीने 182 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 101 धावांची शतकी खेळी केली.
“एक खेळाडू म्हणून मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मला अद्याप काही कळवण्यात आलेले नाही. मी यापुर्वीही सांगितले आहे की, संघाच्या गरजेनुसार मी फलंदाजी करण्यास तयार आहे.” असे विहारी यावेळी म्हणाला.
मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर सलग 4 कसोटी सामन्यात विहारीला खेळवण्यात आले नव्हते. यावेळी संघाबाहेर ठेवल्याने वाईट वाटले नाही का? असे विचारले असता. तो म्हणाला, “काही वेळेला संघ नियोजनालाही समजून घ्यावे लागते. जेव्हा आपण मायदेशात खेळत असतो आणि संघात 5 गोलंदाज असतात. तेव्हा एका फलंदाजाला संघाबाहेर रहावे लागते. मला यातून काही सिद्ध करायचे नाही. मी केवळ प्रक्रियेचे पालन करत असतो.” असेही यावेळी तो म्हणाला.
अनिल कुंबळेकडून गोलंदाजीचे धडे गिरवण्यास युवा भारतीय संघाचा 'हा' खेळाडू उत्सुक
वाचा- ????https://t.co/qlXI56REI3????#म #मराठी #Cricket #TeamIndia @anilkumble1074— Maha Sports (@Maha_Sports) February 15, 2020
या कारणामुळे घडली चेंडू छेडछाडीची घटना, रिकी पाँटिंगने केला खूलासा
वाचा- ????https://t.co/wakw6sZziF????#म #मराठी #Cricket #Australia @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020






