भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस पाहता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारताला सलग दोन दिवस दोन सामने खेळण्यास हरकत नसावी, असे मत आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी मांडली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जुलैमध्ये आशिया चषक 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहिर केले आहे. ही द्विवार्षिक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीत सलग दोन दिवस दोन सामने खेळावे लागणार आहेत. भारतीय संघ 18 सप्टेंबरला पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या संघाविरुद्ध तर 19 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळावा लागणार आहे.
तसेच पाकिस्तानचा साखळी फेरीतील पहिला सामना 16 सप्टेंबरला खेळणार असुन दुसरा 19 सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना दोन सामन्यांसाठी दोन दिवस वेळ मिळणार आहे.
त्यामुळे अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पण जोन्स याबद्दल म्हणाले, “आमच्यावेळी आम्ही अनेक सलग दिवस वनडे सामने खेळलो आहोत. तर मग आत्ता खेळाडू याबद्दल तक्रार का करत आहेत? ते पाच दिवसाचे कसोटी सामने खेळतात. ”
“मला आठवते की आम्ही इंग्लंड दौऱ्यावर असताना तीन वेळा सलग 11 दिवस खेळत होतो. मला माहित आहे सामन्यादरम्यान गरमी असेल. पण म्हणूनच त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो.”
तसेच ते पुढे म्हणाले, “मला भारताने सलग दोन दिवस खेळण्यात कोणतीही समस्या वाटत नाही. नक्कीच सलग सामने खेळल्याने थकवा येईल. पण हे खेळाडू अॅथलिट आहेत आणि ते खूप फिट आहेत. मी तर म्हणेल सलग दोन दिवस खेळल्यामुळे कोणी मरणार नाही.”
या स्पर्धेत अ गटात भारत, पाकिस्तान आणि पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ खेळेल, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
असे आहे आशिया चषकाचे वेळापत्रक:
साखळी फेरी-
15 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – दुबई
16 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ – दुबई
17 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
18 सप्टेंबर – भारत विरुद्ध पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ – दुबई
1 9 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
20 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
सुपर फोर –
21 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – दुबई
21 सप्टेंबर – गट ब विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – अबु धाबी
23 सप्टेंबर – अ गट विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – दुबई
23 सप्टेंबर – ब गट विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
25 सप्टेंबर – अ गट विजेता विरुद्ध ब गट विजेता – दुबई
26 सप्टेंबर – अ गट उपविजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
अंतिम सामना-
28 सप्टेंबर – आशिया चषक 2018 अंतिम सामना – दुबई
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार???
–टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट
–टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण