---Advertisement---

गंभीर-आगरकरांमुळे 3 खेळाडूंचं करिअर संकटात? जबरदस्त खेळूनही संधी नाही

On: सोमवार, नोव्हेंबर 17, 2025 10:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) अनेक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. यात त्यांना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजीत अगरकर (Ajit Agarkar) यांचीही साथ मिळत आहे. गंभीर–अगरकर ही जोडी मिळून भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलत असल्याचं म्हटलं जात आहे. पण त्याचबरोबर काही स्टार खेळाडूंचं करिअर बर्बाद केल्याचा आरोपही या दोघांवर होत आहे. या खेळाडूंमध्ये एकजण तर सध्या टीमचा भाग आहे, तरीही त्या खेळाडूचे फॅन्स मॅनेजमेंटवर आरोप करत आहेत.

सरफराज खान

मध्यक्रमातील स्टार फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीमचा भाग होता. पण एकही सामना खेळण्याची संधी न मिळता त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर केले. टीमबाहेर गेल्यानंतर सरफराजने इंडिया ए साठी तुफानी कामगिरी केली, तरीही त्याला टीममध्ये पुनरागमनाची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या मालिकेसाठी तर त्याला इंडिया ए टीममध्येही स्थान दिलं गेलं नाही. त्यामुळे फॅन्स सरफराजच्या घसरत चाललेल्या करिअरला गंभीर आणि अगरकर यांची जोडी कारणीभूत असल्याचं मानत आहे.

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट खेळ करत आहे. महाराष्ट्रासाठी त्याची धडाकेबाज कामगिरी आणि इंडिया ए साठीची तुफानी फॉर्म यामुळे त्याच्याबद्दल चर्चा वाढली आहे. त्याच्या मागील चार सामन्यांत तो ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला आहे. टी20आय फॉर्मेटमध्येही त्याचा रेकॉर्ड उत्तम आहे, पण तरीही त्याची टीममध्ये परत येण्याची शक्यता दिसत नाही. या मागेही गंभीर–अगरकर हीच जोडी कारणीभूत असल्याचं अनेक फॅन्स म्हणत आहेत.

संजू सॅमसन

टीम इंडियाचा विकेटकीपर–फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या टी20आंतरराष्ट्रीय टीमचा भाग असला तरी तो प्लेइंग 11 मधून बाहेर आहे. शुबमन गिल टीममध्ये आल्यानंतर ओपनिंगची जागा प्रथम सॅमसनकडून काढून घेतली गेली. त्यानंतर त्याला मधल्या फळीत खेळवलं, आणि काही सामन्यांत अपयशी ठरताच टीममधून वगळलं. सॅमसनने सलामी फलंदाज म्हणून टी20 फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वनडे फॉर्मेटमध्येही चांगली कामगिरी असूनही त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळत नाही. फॅन्स यासाठीही गंभीर–अगरकर यांनाच जबाबदार धरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---