नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी गेल्या दशकातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कर्णधार म्हणून धोनीने ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत, सोबतच त्याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना आयपीएलचे ३ विजेतेपद जिंकले आहेत. धोनीचा त्याच्या खेळाडूंवरील प्रभाव हा एका गोष्टीवरून ओळखला जातो, तो म्हणजे धोनीच्या क्रिकेटबद्दल त्याचे संघसहकारी धोनी एक माणूस म्हणून कसा आहे याबद्दल सातत्याने बोलत असतात.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज सॅम बिलिंग्सने अलीकडेच एका मुलाखतीत धोनीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, धोनीने आयपीएलदरम्यान त्याला कशाप्रकारे मदत केली. बिलिंग्जला सीएसकेने आयपीएल २०२० मधून काढून टाकण्यात आले असून तो आयपीएलच्या १३ व्या मोसमात खेळू शकणार नाही.
बिलिंग्जने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “सीएसके संघात मी माझी दोन वर्षे खूप चांगल्या प्रकारे घालविली. कालांतराने वातावरणात सातत्यपूर्ण यश मिळाले ते अप्रतिम आहे. कदाचित फक्त मुंबईच सीएसकेशी सुसंगत असेल. आयपीएल पदक जिंकण्यासाठी मी खरंच चांगला अनुभव घेतला आहे.”
तो पुढे म्हणाला, “परदेशी लोक तसेच भारतीय खेळाडूंकडून मला चांगला अनुभव मिळाला. माझ्या मते, धोनीपेक्षा महान खेळाडू दुसरा कोणी नाही.”
बिलिंग्स पुढे म्हणाले, “धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. माझ्यासाठी, त्याला निवडणे आणि त्याने तयार केलेल्या वातावरणाचा आनंद घेणे चांगले होते. तो मोठा चाहतावर्ग असलेला खेळाडू आहे, जो खरंच मदत करतो. जेव्हा त्याच्या जवळपास चाहते असताना त्याने नेहमीच मला आमंत्रित केले. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा सामना असायचा, तेव्हा आम्ही त्याच्या खोलीत जाऊन तिथे ते पहायचो.”
तो म्हणाला की, क्रिकेटविषयी बोलणे आणि शिकणे खूप चांगले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-अनेक दिग्गजांनाही न जमलेला असा खास पराक्रम करणारा वीरेंद्र सेहवाग एकमेव भारतीय क्रिकेटपटू
-रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
-लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
-हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
-४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने