बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अयपश आले. भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारतीय संघाकडून आर अश्विन याने सर्वाधिक विकेट्सचे योगदान दिले. त्याने 8 विकेट्स घेतल्या. शानदार कामगिरी करणाऱ्या अश्विनने सामन्यानंतर मोठे विधान केले आहे. त्याच्या विधानाने एकच खळबळ माजली आहे.
खरं तर, नागपूर कसोटी (Nagpur Test) सामन्यात भारताच्या पहिल्या डावात केएल राहुल (KL Rahul) बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नाईटवॉचमन म्हणून आर अश्विन (R Ashwin) आला होता. या सामन्यानंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने अश्विनला प्रश्न विचारला की, त्याला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कोणाचा होता?
‘मी सध्या घाबरलेलो आहे’
दिनेश कार्तिक याच्या प्रश्नावर अश्विन म्हणाला की, “मी आतमध्ये बसून फलंदाजांना फलंदाजी करताना पाहून, स्वत: फलंदाजी करण्यासाठी संघर्ष करत आहे. मी सध्या खूपच घाबरलेलो आहे. मी संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की, जर संधी मिळाली, तर मला लवकर फलंदाजी करण्यासाठी पाठवावे आणि संधी मिळाली.”
A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1
— BCCI (@BCCI) February 11, 2023
नाईटवॉचमनची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे अश्विन
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “माझा मित्र पुजारा मला म्हणाला की, आता फक्त 20 मिनिटे बाकी आहेत. मला एका नाईटवॉचमनची गरज आहे. मी ही संधी सन्मानाने गवसली. मी नाईट वास्तवात तिथे जाऊन फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. जेव्हाही संधी मिळते, तेव्हा मी नेहमीच तयार राहतो.”
अश्विनचा विक्रम
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने तिसऱ्या दिवशी गोलंदाजीतून विरोधी फलंदाजांना घाम फोडला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांची विकेट काढली. त्यापूर्वी पहिल्या डावातही त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. यासोबतच त्याने अनेक विक्रम नावावर केले. तो भारताच्या विजयात सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाजही बनला.
त्याने भारताच्या विजयात आतापर्यंत 489 विकेट्सचे योगदान दिले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी अनिल कुंबळे (486 विकेट्स) आहे. तसेच, हरभजन सिंग (406) तिसऱ्या स्थानी आहे. रवींद्र जडेजा याने भारताच्या विजयात एकूण 366 विकेट्सचे योगदान दिले आहेत. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे, तर झहीर खान पाचव्या स्थानी असून त्याने भारताच्या विजयात 349 विकेट्सचे योगदान दिले आहे. (nowadays i am nervous said by ashwin after ind vs aus 1st nagpur test win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’
“ते विमानात बसले तेव्हाच घाबरले”, दणदणीत विजयानंतर जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली