भारताचा पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) खेळला गेला. ज्यामध्ये भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली आणि वॉशिंग्टन सुंदर याने झटपट खेळी केली. ज्यामुळे भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावासंख्या उभारली. या सामन्यात पुन्हा एकदा धवन-गिल जोडीने जबरदस्त कामगिरी करत शतकी भागीदारी केली.
कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) भारताची ही सलामीजोडी चांगलीच फॉर्ममध्ये आहे. या दोघांनी वनडेमध्ये डावाची सुरूवात करताना आतापर्यंत 700 धावा जोडल्या आहेत. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 23 षटकात 124 धावांची भागीदारी केली.
2020 ते 2022 मध्ये गिल-धवन यांनी भारताकडून 9 डावांमध्ये सलामीला फलंदाजी केली. ज्यामध्ये दोघांनी मिळून 87.50च्या सरासरीने 700 धावा केल्या. त्याचबरोबर या 9 डावांमध्ये चार वेळा शतकी भागीदारी केली. दोघांनी या धावा 5.54च्या रनरेटने केल्या.
विशेष म्हणजे, गिल-धवन जोडीने शतकी भागीदारी केली मात्र एकदाही अर्धशतकी भागीदारी केली नाही. तसेच दोघांनी एकदा नाबाद 192 धावांची भागीदारीही केली. ही भागीदारी त्यांनी झिम्बाब्वेच्या दौऱ्यात याचवर्षी केली. या दोघांची कामगिरी अशीच सुरू राहिली तर 2023च्या वनडे विश्वचषकात भारत सलामीला यांनाच पाठण्याची शक्यता अधिक आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी पुन्हा एकदा धवन-गिल जोडीने स्फोटक सुरूवात केली. धवनने 77 चेंडूत 72 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 चौकार मारले. हे त्याचे वनडेतील 39वे शतक ठरले. गिलने 63 चेंडूत 50 धावा केल्या. हे त्याने वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक ठरले.
या सामन्यात भारताला धवन-गिलने 100च्या पार नेले, तर श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताचा धावफलक 300 पर्यंत नेला. यावेळी अय्यरने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने 76 चेंडूत 80 धावा केल्या. सुंदर 16 चेंडूत 37 धावा करत नाबाद राहिला. NZvIND First ODI Match Shikhar Dhawan-Shubman Gill’s four-time century partnership for India in ODIs
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किवींच्या भूमीवर श्रेयस अय्यरची ऐतिहासिक खेळी! फिफ्टी करताच धोनीला टाकले मागे
वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिलचा धुमाकूळ! फिफ्टीबरोबरच केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड नावावर, आकडेवारी पाहाच