---Advertisement---

NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून ‘हा’ कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 1:48 PM
Yuzvendra Chahal & Sanju Samson & Ish Sodhi
---Advertisement---

टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये भारत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियममध्ये खेळला जाणार होता, मात्र पावसामुळे सामना काय नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही. तसेच सामनाही पावसामुळे शेवटी रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी भलताच खेळ करण्यास सुरूवात केली आहे, ज्याचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडूंबरोबर न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही उपस्थिती दर्शवली. हा इनडोर (आत) गेम ‘फूटवॉली’ असून खेळाडू वेळ घालवण्यासाठी आणि वॉर्म-अपसाठी खेळत होते. या दौऱ्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि आर अश्विन यांना विश्रांती दिली आहे.

टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यामध्ये भारताचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. या दौऱ्यातून मोहम्मद शमी यालाही वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन हे पण दिसत आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1593494558507429888?s=20&t=AKV5UF0IOP9Juhup6JRtvw

दिनेश कार्तिक आणि अश्विन टी20 संघात नसल्याने रिषभ पंत आणि चहल यांना अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याची अधिक शक्यता आहे. या मालिकेतील दुसरा टी20 सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1593517381636481024?s=20&t=WIT200K-CXPPSd81qDpy2g

भारताच्या टी20 संघात प्रथमच शुबमन गिल याला निवडले आहे, मात्र पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची आणखी वाट पाहावी लागणार आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, कारण भारताची टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी झाली. त्यातच पुढील टी20 विश्वचषकासाठी अजून दोन वर्ष संघाकडे असून उत्तम सलामीवीर आणि गोलंदाज तयार करण्याची जबाबदारी बोर्डवर आहे. NZvIND: Which game did the players of both teams abandon cricket due to rain? Watch the video

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज
भारतीयांनी विदेशी लीग खेळण्याची गरज आहे? वाचा जहीर खान काय म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---