सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात ३ सामन्यांची द्विपक्षीय वनडे मालिका होणार आहे. ही मालिका संयुक्त अरब अमिराती ऐवजी आता श्रीलंकेत खेळली जाईल. ही मालिका युएईमधून श्रीलंकेत हलवण्यामागे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा हंगाम कारणीभूत ठरला आहे. ही मालिका १ ते ५ सप्टेंबरदरम्यान खेळली जाण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२१ हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम येत्या स्पटेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहे. २० सप्टेंबरपासून उर्वरित आयपीएल २०२१ ला सुरुवात होऊ शकते. या हंगामामुळे पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेसाठी युएईमध्ये स्टेडियम उपबल्ध नाहीत. त्यामुळे ही मालिका श्रीलंकेत हलवण्यात आली आहे. आयपीएल २०२१ नंतर युएईत टी२० विश्वचषकही होणार आहे.
आयपीएलच्या या उर्वरित हंगामामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच कॅरेबियन प्रीमीयर लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्याचबरोबर पाकिस्तान सुपर लीग २०२२चा हंगाम आयपीएल २०२२ बरोबर क्लॅश होऊ नये म्हणून पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२ एप्रिल-मे दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघात पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग आहे. आयसीसी सुपर लीगच्या गुणतालिकेतील पहिले ७ संघ २०२३ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. तसेच या विश्वचषकाचा आयोजक म्हणून भारत आधीच पात्र ठरलेला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात यापूर्वी ४ सामने झाले असून त्यातील ३ सामने युएईमध्ये झाले होते, तर एक सामना २०१९ विश्वचषकात लीड्स येथे झाला.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिका श्रीलंकेतील महिंद्रा राजपक्ष स्टेडियम, हंबंनटोटा येथे होणार आहे. हंबंनटोटा येथे अखेरचा वनडे सामना फेब्रुवारी २०२०मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजला १६१ धावांनी पराभूत केले होते. तसेच सामन्याचे तटस्थ ठिकाण ठरण्याची या स्टेडियमची दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध केनिया सामन्याचे आयोजन या स्टेडियमवर झाले होते.
पाकिस्तान संघ अफगाणिस्ताविरुद्ध खेळण्यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. तिथे २७ जुलैपासून त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर २ सामन्यांची कसोटी मालिका होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाची बातच न्यारी, वनडेत चक्क १२० वेळा उभारल्यात ३०० धावा; वाचा टॉप-१० संघांची कामगिरी
‘या’ ३ भारतीय फलंदाजांचा टी२० विश्वचषकात राहिला दबदबा, ठोकलेत सर्वाधिक षटकार
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, संघनायक गंभीर जखमी; २ मालिकेतून बाहेर