विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या संघांपैकी एक म्हणजे भारतीय संघ होय. भारताने आतापर्यंत खेळलेले 5 सामने जिंकले आहेत. भारताचे सर्वच खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत. तसेच, संघात एकजुटता दिसत आहे. मात्र, विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे आता ही संघासाठी मोठी चिंता बनली आहे. पंड्या या सामन्यात गोलंदाजी करत होता, पण त्यावेळी तो चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नाही. आता त्याच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
हार्दिक पंड्या हेल्थ अपडेट
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या दुखापतीवर काम करत आहे. तो सध्या बंगळुरू येथील एनसीएमध्ये बरा होत आहे. त्याला 19 ऑक्टोबर रोजी दुखापत झाली होती. त्यानंतर लगेच त्याला स्कॅनसाठी पाठवले गेले होते. भारताला आपला पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. अशात हार्दिकला तंदुरुस्त होण्यासाठी 10 दिवसांची वेळ मिळाला आहे. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही विश्रांतीवर असेल. वृत्तांमध्ये असेही सांगण्यात आले की, पंड्याची दुखापत गंभीर नाहीये, पण त्याला दुखापतीपासून वाचण्यासाठी आणखी विश्रांती दिली जाईल.
खरं तर, भारतीय संघ स्पर्धेत सध्या चांगल्या स्थितीत आहे. तसेच, पुढील सामन्यात कदाचित भारताला पंड्याची म्हणावी तशी गरज नाहीये. अशात संघ व्यवस्थापन हार्दिकला आणखी विश्रांती देऊ शकते. हार्दिकच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडलाही धरमशाला येथे सहजरीत्या पराभूत केले होते. पंड्या विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये पूर्णपणे फिट राहील, यासाठी त्याला बरे होण्यासाठी आणखी वेळ दिला जाऊ शकतो.
वृत्तांमध्ये असेही म्हटले जात आहे की, पंड्याला इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाईल. मात्र, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन करेल.
Hardik Pandya is likely to miss match against England and Sri Lanka in this World Cup.
He is set to be available in the match against South Africa. (To Indian Express) pic.twitter.com/AT5Onk2K3O
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 25, 2023
हार्दिकच्या जागी कोण खेळणार?
हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमार यादव याला संधी दिली होती. तसेच, गोलंदाजीत शार्दुल ठाकूर याला काढून मोहम्मद शमी याला खेळवले होते. असेच काहीसे इंग्लंडविरुद्धही पाहायला मिळू शकते. इंग्लंडविरुद्धचा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. अशात असेही होऊ शकते की, रोहित सूर्याच्या जागी अश्विनला संघात खेळवेल. मात्र, संघात बदल होतात की नाही, हे सामन्याच्या दिवशीच कळेल. (odi world cup 2023 indian all rounder hardik pandya may miss india vs england match due to injury)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वी नेदरलँड्सच्या खेळाडूचे विधान; म्हणाला, ‘आम्ही इथे सेमीफायनल…’
ऑस्ट्रेलियाला नमवत नेदरलँड्स करणार का उलटफेर? ‘या’ संघाचं पारडं जड, सामन्याविषयी जाणून घ्या सर्वकाही