भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक कर्मचारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रविवारी दुबईला पोहोचले. शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि नवोदित खेळाडू हनुमा विहारीही युएईला पोहोचले आहेत. तसेच अन्य सपोर्ट स्फाफमधील सदस्यही दुबईला पोहचले आहेत.
बायो बबलमध्ये दिला जाईल प्रवेश
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “प्रत्येकाला बायो बबलमध्ये प्रवेश दिला गेला आहे. शास्त्री व्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे सर्व क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, सर्वांच्या 3 आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात येणार आहेत.”
क्वारंटाईन कालावधीनंतर करतील सराव
“पुजारा, विहारी आणि इतर कर्मचार्यांसाठी स्वतंत्र बायो बबल तयार करण्यात आला आहे. पुजारा आणि विहारी दोघेही आयसीसी अकादमीमध्ये 6 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर प्रशिक्षणात सामील होतील. आयपीएल संपेपर्यंत हे दोन्ही फलंदाज दुबईमध्ये प्रशिक्षण घेतील. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांसह एकूण 50 लोक ऑस्ट्रेलिया दौर्यावर दौर्यावर जातील.” असेही पुढे बोलताना सूत्राने सांगितले.
भारतीय संघ खेळणार 3 वनडे, 3 टी 20 आणि 4 कसोटी सामने
आयपीएल 10 नोव्हेंबरला संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ थेट युएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. त्यानंतर ते 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील. त्यानंतर भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला 3 टी20 सामन्यांची मालिका होईल.
मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर ऍडिलेडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. दिवस-रात्र कसोटी सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. परदेशात भारत पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल. तिसरा कसोटी सामना सिडनी येथे 7 ते 11 जानेवारीदरम्यान खेळला जाईल. अंतिम कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये 15 ते 19 जानेवारीदरम्यान होईल.
ऑस्ट्रेलिया दौर्याआधी इशांत होईल तंदुरुस्त
ऑस्ट्रेलिया दौर्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख राहुल द्रविड यांनी बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. इशांत 18 नोव्हेंबरपासून गोलंदाजी करायला सुरुवात करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
आयपीएलमध्ये जखमी झाल्यानंतर इशांत एनसीएमध्ये उपचारासाठी गेला होता. एनसीएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “इशांत पूर्णपणे तंदुरुस्त होण्यापूर्वी सराव सामन्यात गोलंदाजी करू शकतो.”
भारतीय संघाची झाली आहे घोषणा
सोमवारी(26 ऑक्टोबर) बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तरी अजून या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक आलेले नाही. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सध्यातरी रोहित शर्मा आणि इशांत शर्माला संधी देण्यात आलेली नाही. हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने त्यांना संधी दिलेली नाही. पण बीसीसीआयने सांगितले आहे की त्यांच्या दुखापतीवर मेडिकल टीम नजर ठेवून आहे. त्यामुळे जर हे दोघे वेळेत बरे झाले तर त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाता येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिन्ही संघात स्थान पटकणारे शिलेदार
टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल






