बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी कर्णधार रोहित शर्माने घाम गाळण्यास सुरुवात केली. बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा जिममध्ये मेहनत करताना दिसत आहे. सुरुवातीला रोहित टायर लिफ्टिंग करतोय. तर बाकीचे इतर प्रकारचे व्यायाम करताना दिसतात. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार फिटनेसबाबत कोणतीही कसर सोडत नाही.
याआधी रोहित शर्मा ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत दिसला होता. आता वनडेनंतर तो थेट कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितने चांगली फलंदाजी केलेली. मात्र, या मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
यापूर्वी रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता, त्यातील शेवटचा सामना मार्चमध्ये खेळला गेला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी महत्त्वाच्या असतील.
CAPTAIN ROHIT SHARMA working hard in the Gym ahead of the Test season. 🇮🇳 pic.twitter.com/8DnxWgdnOU
— Johns. (@CricCrazyJohns) September 7, 2024
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी20 मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होईल. त्यानंतर दुसरी कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाईल.
यानंतर टी20 मालिका सुरू होईल. त्यातील पहिला सामना 06 ऑक्टोबर (रविवार) रोजी, दुसरा सामना 09 ऑक्टोबर (बुधवार) आणि तिसरा सामना 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी होणार आहे. पहिला टी20 सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर, दुसरा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आणि तिसरा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तो तुमच्या पाठीमागे बोलत नाही, पाकिस्तानला गंभीरसारख्या कोचची गरज; कुणी केलं विधान?
आता होणार धिंगाणा! पंत जुन्या फॉर्मात परतला, दुलीप ट्रॉफीत झळकावले वेगवान अर्धशतक
19 वर्षीय खेळाडू करणार भारतीय संघात पदार्पण? माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा