---Advertisement---

दोन वर्षांपूर्वी ‘सांगली एक्सप्रेस’ स्म्रीती मंधनाने केला होता ‘तो’ खास पराक्रम

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 6:14 PM
---Advertisement---

भारताची धडाकेबाज महिला क्रिकेटपटू स्म्रीती मंधनाने आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. तिने अनेकदा मोठ्या आणि महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. असाच एक पराक्रम तिने २ वर्षांपूर्वी केला होता, मात्र त्या पराक्रमाला पराभवाची झळ बसली होती.

दोन वर्षांपूर्वी ६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताचा वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामना झाला होता. या सामन्यात सांगलीकर मंधनाने ३४ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या होत्या. या दरम्यान तिने २४ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे ती टी२०मधील भारताकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी महिला क्रिकेटपटू ठरली होती.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० मधील आधीची दोन जलद अर्धशतकेही स्म्रीतीच्याच नावावर आहेत. तिने २०१८ सालामध्ये २५ चेंडूत इंग्लंड विरुद्ध तर ३० चेंडूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध जलद अर्धशतक पूर्ण केले होते. हे दोन्ही सामने मुंबईमध्ये झाले होते.

भारताला व्हावे लागले पराभूत 

मात्र, ६ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या या सामन्यात भारताला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सोफी डिवाईनने केलेल्या ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १५९ धावा केल्या होत्या व भारताला १६० धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना स्म्रितीने जेमिमा रोड्रिगेजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. रोड्रीगेजने ३३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. पण या दोघी बाद झाल्यानंतर भारताचा डाव पत्यासारखा कोसळला. या दोघींशिवाय फक्त कर्णधार हरमनप्रीत कौरला १७ धावांची दोनआकडी धावसंख्या करता आली. अन्य सर्व फलंदाज १० धावा देखील करु शकले नाही. त्यामुळे भारतीय संघ १३६ धावांवर सर्वबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग! सिडनी सिक्सर्सने पटकावले बिग बॅश लीगच्या दहाव्या पर्वाचे विजेतेपद, अंतिम सामन्यात पर्थ स्काॅचर्सचा २७ धावांनी पराभव

जेव्हा एखादी नविन मुलगी वर्गात एन्ट्री मारते, तेव्हा..! विराट-रोहितच्या ‘त्या’ फोटोवर भन्नाट मीम्स व्हायरल 

‘ये हमारा लडका नहीं हैं!’ चूकीचे डीआरएस घेतल्यानंतर विराट ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मिम्स होतायेत व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---