भारतीय संघाने २०११ रोजी दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कीर्तीमान केला होता. तसेच आजच्याच दिवशी (३० मार्च) २०११मध्ये भारतीय संघाने हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाला २९ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाने २८ वर्षांनंतर विश्वचषक देखील जिंकला होता.यासोबतच त्यांनी एक विक्रम देखील आपल्या नावावर केला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलचा सामना ३० मार्च २०११ रोजी मोहाली स्टेडियममध्ये खेळला गेला होता. स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. अशातच नाणेफेकीचा कौल देखील भारतीय संघाच्या दिशेने लागला होता.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याची सुरुवात सचिन आणि सेहवागच्या जोडीने चांगली केली होती. त्यानंतर ४८ धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला, सेहवाग माघारी परतला होता. सचिनने या सामन्यात सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती.याव्यतिरिक्त गौतम गंभीर २७, एमएस धोनी २५ आणि सुरेश रैनाच्या नाबाद ३६ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटक अखेर ९ बाद २६० धावा केल्या होत्या.
पाकिस्तान संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी २६१ धावा करायच्या होत्या. परंतु भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी नांगी टाकली. पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. कामरान अकमल याने १९ धावा केल्या होत्या तर मोहम्मद हाफिज याने ४३ धावांचे योगदान दिले होते. परंतु त्यानंतर झहीर खान आणि भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत.
पाकिस्तान संघाकडून मिस्बाह अल हकने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली होती. तसेच पाकिस्तान संघाला अवघ्या २९.५ षटकांत सर्व बाद २३१ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने २९ धावांनी आपल्या नावावर केला होता. यासोबतच त्यांनी आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान संघाविरुद्ध एकदाही पराभूत न होण्याच्या विक्रम कायम ठेवला.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्धच्या पराभवासोबतच हैदराबादच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद; वाचा सविस्तर