भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिले. द्रविड खासकरून कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखला जात. चाहते त्यांना ‘द वॉल’ या नावाने ओळखंत असायचे. क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील द्रविड नेहमीच चर्चेत राहिला. खासकरून मुलींमध्ये द्रविडविषयीचे आकर्षण जास्त असल्याचे पाहायला मिळायचे. बॉलिवुड अभिनेत्री रिचा चड्डा हिच्या एका वक्तव्यावरून हीच गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली.
बॉलिवुड अभिनेत्री रिचा चड्डा (Richa Chadha) नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असते. काही दिवसांपूर्वी तिने भारतीय सैन्याविषयी केलेल्या एका ट्वीटमुळे ती चांगलीच ट्रोल होताना दिसली होती. अनेकदा तिचे नाव क्रिकेटशी देखील जोडले जाते. क्रिकेटवर आधारित वेबर सिरीज ‘इनसाईड एड्ज’ मध्येही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिरीजच्या तिसऱ्या हंगामात तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना चांगलीच भावली आहे. रिचा चड्डाला यापूर्वी एका मुलाखतीत तिच्या आवडत्या क्रिकेपटूविषयी प्रश्न विचारला गेला. यावर तिने राहुल द्रिवड (Rahul Dravid) यांचे नाव घेतले.
यावेळी माध्यमांशी बोलताना रिचा चड्डा म्हणाली की, “राहुल द्रविड भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर तिने क्रिकेट पाहणेच बंद केले.” दरम्यान रिचाच्या या वक्तव्यानंतर तिचा पुन्हा एकदा माध्यमांमध्ये चर्चेत आली आहे. तिच्या या वक्तव्यावरून राहुल द्रविडविषयी मुलांमध्ये त्याकाळी असलेल्या आकर्षण स्पष्टपणे दिसून येते. चाहते तिच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. द्रविडने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ताचा निर्णय घेतला होता. त्याने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना (ODI) 2011 मध्ये खेळला.
सध्या तो भारतासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका चांगल्या प्रकरे पार पाडत आहे. मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीआधीच बाहेर पडला आणि त्यानंतर संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. त्यातील एक बदल म्हणजे मुख्य प्रशिक्षपदी द्रविडची नियुक्ती. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयने द्रविडच्या कांत्यावर ही जबाबदारी सोपवली. द्रविडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13288 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 344 सामने खेळले आणि 10889 धावा स्वतःच्या नावावर केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या तर इरफानसारख्या, रैनाचा दिवस बनवला खास
FIFA WORLD CUP: अनपेक्षित निकालांचे सत्र सुरूच; दुसऱ्या क्रमांकावरील बेल्जियम मोरोक्कोकडून चित