भारतीय संघातून बाहेर असणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारताच्या टी२० संघात पुनरागमन करण्याचा विश्वास दाखविला आहे. कार्तिकची सरासरी टी२० क्रिकेटमध्ये चांगली असल्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ शकते. त्याला मागील वर्षी वनडे विश्वचषकानंतर संघातून बाहेर करण्यात आले होते. Dinesh Karthik said that he has no reason to doubt that he is still capable of making a comeback in to the Indian side in the shortest format of the game.
आयपीएल फ्रंचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार कार्तिकने (Dinesh Karthik) पीटीआयशी बोलताना सांगितले की, “मी वनडे सामन्यातून बाहेर जाणे समजू शकतो. परंतु टी२० मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कारण मी नुकतेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मी टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन न करण्याचे असे कोणतेही कारण नाही. संघातून बाहेर पडल्यानंतर मला दु:ख झाले. कारण मला देशासाठी हिंमतीने खेळायचे होते.”
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कार्तिकने एमएस धोनीच्याही (MS Dhoni) अगोदर पदापर्ण केले होते. परंतु त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने मागील १६ वर्षांमध्ये २६ कसोटी सामने, ९० वनडे सामने आणि ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
धोनीने चमकदाक कामगिरी केल्यामुळे कार्तिकला संघात स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे अनेक वेळा त्याला स्वत:ला सिद्ध करून संघात स्थान मिळविण्यासाठी धडपड करावी लागली.
अशामध्ये आता कार्तिकची निवड टी२० संघात (T20) झाली तर धोनीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) सध्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएलचे आयोजन झाले तर, कार्तिकला आपली कामगिरी दाखवता येऊ शकते. परंतु आयपीएलही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे गोष्टी केव्हापर्यंत ठीक होतात हे पहावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटी पदार्पणात भारताविरुद्ध भारतात शतक करणारे ५ खेळाडू
-भारतात कसोटीत सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेले ५ महान क्रिकेटर
-४ कारणं ज्यामुळे पृथ्वी शाॅ कधीच नाही होऊ शकत सचिन