वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर 80 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1ने मागे आहे.
या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या. यासाठी त्याने 31 चेेंडूचा सामना करत 5 चौकार आणि 1 षटकार मारला.
धोनीच या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. यामुळे धोनीने टी२० डावात सर्वाधिक धावा केल्या आणि टीम इंडिया पराभूत झाली असे पाचव्यांदा घडले.
परंतु हा नकोसा विक्रम आजही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर कायम आहे. तब्बल ७वेळा विराटने टी२०मध्ये डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि या सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावे लागले आहे.
या खेळाडूंनी संघाकडून डावात सर्वाधिक धावा करुनही टीम इंडियाला पराभूत झाली
७- विराट कोहली
५- एमएस धोनी
५- सुरेश रैना
४- रोहित शर्मा
४- गौतम गंभीर
महत्त्वाच्या बातम्या-
–जर आजच्या सामन्यात युवराज असता तर टीम इंडिया पराभूत झाली नसती
–आजचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी, कधीही विचार नाही केला तो विक्रम नावावर
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती