भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने शुक्रवारी (1 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवर मत मांडले. भारतीय संघ शनिवारी (2 नोव्हेंबर) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकातील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अधिक महत्व होते आणि रोहितने यावेळी प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरे दिली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्यामुळे पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. भारतीय कर्णधाराकडून प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. रोहित शर्मा मागच्या काही वर्षांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करताना दिसला नाहीये. शुक्रवारी त्याने स्वतः देकील मान्य केले की, तो मागच्या दोन वर्षात अधिक जोखीम घेऊन खेळला, ज्यामुळे अनेकदा त्याला स्वस्तात विकेट गमवावी लागली. मात्र, आगामी वनडे विश्वचषकात रोहितला सलामीवीर म्हणून खेळताना सावधगिरी बाळगावी लागणार, यात संखा नाही.
याच पार्श्वभूमीवर रोहित आपल्या वैयक्तिक प्रदर्शनाबाबत म्हणाला की, “मागच्या काही महिन्यांमध्ये मी जास्त जोखीम घेऊन खेळलो आहे. आता वनडे क्रिकेटमध्ये मला यावर नियंत्रण आणावे लागेल. एक सलामीवीर फलंदाज म्हणून मी संघासाठी चांगला पाया तयार करणे गरजेचे आहे. चांगल्या लायीत असताना मला वाद व्हायला आवडणार नाहीये. टी-20 खेळताना याबाबत जास्त विचार करत नाही. पण वनडेत ही गोष्ट महत्वाची आहे. सलामीवीर म्हणून मी दीर्घ काळा खेळपट्टीवर टिकावे, अशी संघाची इच्छा असते. मी माझा एवढा मोठा अनुभव संघाला सुस्थितीत पोहोचवण्यासाठी वापरणार आहे.”
दरम्यान, आशिया चषक 2023 मध्ये रोहित नेहमीप्रमाणे सलामीवीला फलंदाजी करताना दिसेल. त्याला साथ देण्यासाठी शुबमन गिल डावाची सुरुवात करताना दिसेल. केएल राहुल देखील सलामीसाठी दावेदार होता. पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुल फिटनेसच्या कारणास्तव खेळू शकणार नाहीये. (Opener Rohit Sharma will be seen playing cautiously in the match against Pakistan)
आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन.
सेहवागने पाया घातलेल्या ‘या’ विक्रमात न्यूझीलंडचा फलंदाजही सामील, इंग्लंडच्या गोलंदाजाला चोप चोप चोपलं
खूपच जास्त नाराज आहे संजू सॅमसन! यष्टीरक्षक फलंदाजांचा ‘तो’ फोटो व्हायरल, कारणही घ्या जाणून