मुंबई म्हटलं की अनेक क्रिकेटप्रेमींना आठवते ते प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम. तेच स्टेडियम, जिथे २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. ज्यात धोनीने षटकार ठोकत २८ वर्षांनंतर भारताचे नाव विश्वचषकावर कोरले. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवरच खेळला. आता हेच वानखेडे स्टेडियम क्रिकेटप्रेमी पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
पर्यटन विकास मंडळाने मुंबई क्रिकेट असोसिएशला ‘वानखेडे स्टेडियम सफर’ प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्विकारला आहे.
याबद्दलची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की ‘आम्ही पर्यटन विकास मंडळाने मुंबई क्रिकेट असोसिएशला(एमसीए) जगभरातील पर्यटक आणि चाहत्यांना स्टेडियमचा अनुभव घेण्यासाठी वानखेडे स्टेडियम उघडण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यांनीही यावर आमच्याबरोबर एकत्रितपणे काम करण्याचे मान्य केले आहे.’
https://twitter.com/AUThackeray/status/1308324012829761536
‘या स्टेडियमच्या सफारीव्यतिरिक्त, मी आदरनीय शरद पवार आणि एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याशी क्रिकेटच्या संग्रहालयाबद्दलही चर्चा केली. एमसीए यासाठी तयार असून हे संग्रहालय वानखेडे स्टेडियममध्ये किंवा एखाद्या योग्य जागी उभारले जाईल.’
https://twitter.com/AUThackeray/status/1308324624451604480
‘या भागीदारीसाठी मी एमसीए अपेक्स कमिटीचा आभारी आहे. आपल्यातील अनेकांसाठी क्रिकेट एका धर्माप्रमाणे आहे. वानखेडे स्टेडियमवर भारताने विश्वचषक जिंकला आहे. हे ठिकाण केवळ पर्यटकांसाठीच नाही तर क्रिकेटचाहत्यांसाठी पर्वणी असेल. आम्ही मुंबई इंडियन्सलाही यात सहभागी होण्याची विनंती करतो.’
https://twitter.com/AUThackeray/status/1308324937376002048
https://twitter.com/AUThackeray/status/1308349728619458560
सध्या कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे वानखेडे स्टेडियम बंद आहे.
भारतात धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम पहाण्यासाठी हिमाचल क्रिकेट असोसिएशनकडून परवानगी दिली जाते. तसेच लंडनमध्ये असलेले लॉर्ड स्टेडियमही पर्यटकांसाठी खुले करण्यात येते. तेथे देखील एक क्रिकेट संग्रहालय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी
‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया
पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण
ट्रेंडिंग लेख –
दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम
केवळ चार आयपीएल सामन्यातच झाले ३ मोठे खेळाडू जखमी
आयपीएलमधील ५ स्टार फलंदाज, जे सर्वाधिक वेळा झालेत शुन्यावर बाद





