---Advertisement---

पंतने केला आपल्याच कर्णधाराला विरोध, श्रेयस अय्यरला बदलावा लागला निर्णय, पहा व्हिडिओ

On: गुरूवार, मे 9, 2019 6:16 PM
---Advertisement---

बुधवारी(8 मे) आयपीएल 2019 च्या एलिमेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवत आपले आयपीएल 2019मधील आव्हान कायम ठेवले आहे. या विजयामुळे दिल्लीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैद्राबादचे आव्हान पराभवामुळे संपुष्टात आले आहे.

या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 162 धावा केल्या होत्या. त्यांच्या या डावातील 20 वे षटक चांगलेच रोमांचकारी ठरले. या षटकात दिल्लीकडून किमो पॉल गोलंदाजी करत होता. यावेळी या षटकात हैद्राबादने 11 धावा काढल्या पण त्याचबरोबर 3 विकेटही गमावल्या.

या षटकातील पाचव्या चेंडूवर हैद्राबादचा फलंदाज दिपक हूडा धावबाद झाला. पण त्यावेळी त्याला बाद देण्यावरुन मैदानावरुन बरीच चर्चा झाली. झाले असे की पॉलने टाकलेला हा चेंडू वाईड होता. यावर राशिद खान आणि हुडा एकेरी धाव घेण्यासाठी धावले.

पण यष्टीरक्षक रिषभ पंतने चेंडू थेट स्टम्पवर फेकला. मात्र त्याचवेळी खेळपट्टीच्या मध्ये हुडा आणि पॉल एकमेकांना धडकून खाली पडले. तसेच हुडा वेळेत क्रिजमध्ये पोहचूही शकला नाही. त्यामुळे तो धावबाद झाला.

त्यानंतर मैदानावरील पंच एस रवी यांनी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला धावबादचे अपील मागे घेणार का असा प्रश्न विचारला. यावेळी अय्यरने हुडाला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही गोष्ट पंतला पटली नाही.

त्याने लगेचच अय्यरला हा निर्णय बदलण्यास सांगितले. त्यामुळे पुन्हा पंचानी पंत आणि अय्यरशी चर्चा केली. अखेर अय्यरला पंतचे ऐकावे लागले आणि त्याने दिपकला धावबाद देण्याचा निर्णय पंचांना सांगितला.

या सामन्यात अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या हैद्राबादला 20 षटकात  8 बाद 162 धावा करता आल्या. हैद्राबादकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक 36 धावा केल्या. तसेच गोलंदाजीत दिल्लीकडून किमो पॉलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्माने 2 आणि ट्रेंट बोल्ट, अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यांनंतर 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून पृथ्वी शॉने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 19.5 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 163 धावांचे आव्हान पूर्ण केले.

गोलंदाजीत हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि राशिद खानने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर दिपक हुडाने 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तीन वर्षांनंतर फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही सारखाच…

गमतीशीर! श्रेयस अय्यरने नाणेफेकीवेळी केली मजेदार चूक, पहा व्हिडिओ

२०१९ विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना १५ दिवसांसाठी मिळू शकते पत्नीची सोबत

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment