---Advertisement---

चौथा कसोटी सामना ओव्हलवर, पाहा काय सांगतो या मैदानावरील नाणेफेकीचा इतिहास

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 12:28 AM
Joe Root and Virat Kohli
---Advertisement---

ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे. ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या मैदानावरील सामन्यांचा इतिहास पाहिला तर, इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. यासह एक आकडेवारी भारतीय संघाच्या चिंतेत देखील भर टाकत आहे.

या महत्वाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य ठरवत, इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवरच संपुष्टात आणला. त्यानंतर पहिल्या दिवसाखेरपर्यंत इंग्लंडनेही ३ विकेट्स गमावून ५३ धावा केल्या आहेत.

काय सांगतो ओव्हलच्या मैदानावरील इतिहास?
ओव्हलच्या मैदानावर ज्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो संघ ३२ वेळेस विजयी झाला आहे. तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला या मैदानावर अवघे ३ सामने जिंकण्यात यश आले आहे. इंग्लंड संघाने देखील भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मैदानावरील इतिहास पाहता, भारतीय संघाला नक्कीच आनंद झाला असेल.

तसेच, या मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकूण ५ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने २५ सामन्यात विजय मिळवला आहे.

असे असले तरी, भारतासाठी चिंतेची एक बाब म्हणजे, या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर जे ३ सामने जिंकण्यात आले आहेत, त्यात २०१४ सालच्या इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याचाही समावेश आहे. त्यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती आणि तो सामना १ डाव आणि २४४ धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

ईशांतच्या आवाजाची नक्कल करत युवराजने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

‘आम्ही असा संघ तयार केला, ज्याला पराभूत करण्याचा सर्वांचा प्रयत्न’, शास्त्रीबरोबरच्या संबंधाबद्दल विराटचे भाष्य

आयसीसीने मदत न केल्याने देश सोडण्याची पाळी आली, अफगाणिस्थानच्या महिला क्रिकेटरने मांडली व्यथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---