आयपीएल २०२१ मधील दुसरा टप्पा यूएईत पार पडत आहे. यावेळी आयपीएलचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे. दुसरीकडे प्लेऑफपूर्वीच मुंबई इंडियन्स संघ बाहेर पडल्याने संघातील खेळाडू आपला वेळ वेगवेगळ्या प्रकारे घालवत आहेत. अशातच मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याच्या पत्नीचे फोटो समोर आले आहेत.
आयपीएल २०२१ च्या व्यस्त वेळापत्रकानंतर बुमराह युनायटेड किंगडममध्ये एका छोट्याशा सुट्टीचा आनंद लुटत आहे. बुमराह आता आपली पत्नी संजना गणेशनसोबत मॅनचेस्टरमध्ये आहे. संजना स्पोर्ट्स निवेदिका आहे. ती आयपीएल २०२१ चे कामकाज पाहणाऱ्या प्रसारण टीमचा भाग होती. (Pacer Jasprit Bumrah Raeached Manchester Uniteds Home Ground With Wife Sanjana Ganesan After Break From IPL)
या स्टार जोडीने द थिएटर ऑफ ड्रीम्सचा दौरा केला, जे मॅनचेस्टर युनायटेडचे घरचे मैदान (Home Ground) आहे. या मैदानाची प्रेक्षकसंख्येची क्षमता तब्बल ७५ हजार इतकी आहे. हे सर्वात मोठे स्टेडिअम आहे. बुमराहने ९३ क्रमांकाची एक वैयक्तिक मॅनचेस्टर युनायटेडची जर्सीही मिळवली. यावर पाठीमागे बुमराहचे नावही आहे.
मॅनचेस्टर युनायटेडने बुमराह आणि संजनाचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यांनी हे फोटो शेअर करत लिहिले की, “ओल्ड ट्रॅफर्ड, जसप्रीत तुला पाहून खूप चांगले वाटले.”
😎👋 A special visit to Old Trafford for @BCCI star @JaspritBumrah93! 🔴🇮🇳#MUFC pic.twitter.com/MRz3UGvnUN
— Manchester United (@ManUtd) October 14, 2021
बुमराहने आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना १४ सामन्यांमध्ये सर्वाधिक २१ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यापूर्वी या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानी आहे.
आयपीएल २०२१मध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यांनी १४ सामन्यांपैकी ७ सामन्यात विजय, तर उर्वरित ७ सामन्यात पराभवाचा सामना केला होता. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अशाप्रकारे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले.
आता २७ वर्षीय बुमराह युएईमध्ये आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील होईल. येत्या २४ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
सुपर १२ मधील प्रत्येक ग्रूपमधून अव्वल ४ संघ नॉकआऊट टप्प्यात पोहोचतील.
आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
-अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला
-‘हा एक हृदयद्रावक शेवट’, आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभूत झाल्यानंतर रिषभ झाला भावूक