रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील 27वा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात बेंगलोरने 24 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला. गुरुवारी (दि. 20 एप्रिल) मोहालीत पार पडलेल्या या सामन्यात सिराजने 21 धावा खर्च करत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यासाठी मोहम्मद सिराज सामनावीर पुरस्काराचा मानकरीही बनला. यासह पर्पल कॅप त्याच्याकडे आली. सामन्यानंतर सिराजने त्याच्या संघर्षाच्या दिवसांचा उल्लेख केला. त्याने सांगितले की, कशाप्रकारे लॉकडाऊनने त्याचे नशीब बदलले.
पर्पल कॅप पटकावताच मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) म्हणाला की, “सन 2016मध्ये भुवनेश्वर कुमार याला पर्पल कॅप मिळाली होती. मात्र, भुवीच्या जागी पर्पल कॅप मी घेतली होती. त्यावेळी मी कोणत्या ना कोणत्या दिवशी पर्पल कॅप मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. आता ही मला मिळाली आहे, तर खूपच चांगलं वाटत आहे.”
सिराजने त्याच्या यशामागील रहस्याच्या खुलासादेखील केला. तो म्हणाला की, “2019ची आयपीएल माझ्यासाठी खूपच वाईट ठरली. मी खूपच धावा खर्च केल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनदरम्यान मी जिम केली आणि गोलंदाजीचा कसून सराव केला. वनडेत मला यश मिळाले. तेच यश मी आयपीएलमध्ये पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”
https://twitter.com/RCBTweets/status/1649070504161181696
कर्णधार विराटचा विश्वास ठरवला सार्थ
सिराजने यापूर्वीही त्याच्या यशाचे श्रेय विराट कोहली (Virat Kohli) याला दिले आहे. 2019मध्ये खूपच खराब प्रदर्शन करूनही कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) याच्यामुळे आरसीबीने सिराजला रिटेन केले होते. 2020मध्ये सिराजने हा विश्वास सार्थ ठरवला आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
सिराजच्या आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे त्याला 2020मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी कसोटी पदार्पणाची संधीही मिळाली होती. सध्या सिराज वनडे आणि कसोटीत भारतीय संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज बनला आहे. खरं तर, सिराजने आरसीबीच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. सिराज पॉवरप्लेमध्ये कसून गोलंदाजी करून विरोधी संघावर दबाव आणण्याचे काम करतो.
https://twitter.com/IPL/status/1649053157136400390
सिराजच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 71 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 8.57च्या इकॉनॉमी रेटने 71 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये पंजाबविरुद्धची त्याची 21 धावा देत 4 विकेट्स ही कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (pacer mohammed siraj revels that how lockdown helps him to perform better in ipl 2023 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या विजयासह वॉर्नरचा भीमपराक्रम! रोहितचा अशक्य वाटणारा रेकॉर्ड टाकला मोडला, बनला टॉपर खेळाडू
बोंबला! ट्विटरकडून रोहित, विराट अन् धोनीच्या अकाऊंटवर मोठी कारवाई; काय राडा घातलाय वाचाच






