---Advertisement---

PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स

On: शनिवार, मार्च 5, 2022 12:49 PM
Pakistan-Pitch
---Advertisement---

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यामध्ये शुक्रवारी (४ मार्च) रावलपिंडी येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. यावर्षी तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर(Australia tour of Pakistan) आहे. ऑस्ट्रेलिया संघ शेवटचा १९९८ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. दरम्यान, रावलपिंडी येथील सामना सुरु होण्यापूर्वीचे खेळपट्टीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

फॉक्स क्रिकेटने पहिल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीचे मीम्स देखील शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत. खेळपट्टी पाहून लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत याला सपाट खेळपट्टी म्हणले आहे. सोशल मीडियावर क्रिकेट चाहते खेळपट्टीबाबत विनोदही शेअर करत आहेत. लोकांनी खेळपट्टीची तुलना रस्त्याशी केली आहे.

कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन म्हणाला की, तयार केलेली विकेट यूएईसारखी दिसत आहे आणि त्याला चांगल्या फलंदाजी खेळपट्टीची आशा आहे.

https://twitter.com/FoxCricket/status/1498848207928889350

https://twitter.com/Kewaltweets/status/1499735095778983939

https://twitter.com/Alyan28628202/status/1498998801704570887

https://twitter.com/khiladi2002/status/1499108517889912835

https://twitter.com/IanGortonEsq/status/1499004020899606528

https://twitter.com/ThatUlisse/status/1499066945018212352

https://twitter.com/ChoudhryMuneeb/status/1498957695583506434

ऑस्ट्रेलियाने अलीकडेच ऍशेस मालिका ४-० ने जिंकली आहे. पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात कोणताही मोठा बदल झालेला नाही. याशिवाय पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने ३ फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलिया संघात नॅथन लायन, मिशेल स्विप्सन आणि ऍश्टन एगार या तीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना रावलपिंडी येथे ४ मार्च ते ८ मार्चपर्यंत खेळला जाणार आहे. १२ते १६ मार्चदरम्यान दुसरा सामना कराची येथे खेळला जाणार आहे तर २१ ते २५ मार्च दरम्यान लाहोर येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर पहिला, दुसरा , तिसरा एकदिवसीय सामना रावलपिंडी येथे अनुक्रमे २९ मार्च, ३१ मा्र्च आणि २ एप्रिल रोजी खेळले जाणार आहेत. तसेच ५ एप्रिलला एकमेव टी२० रावलपिंडी येथे पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रिषभ ९६ धावांवर बाद होताच गावसकर, धोनी यांच्या ‘या’ विक्रमांशी झाली बरोबरी

“रोहितला गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचा पुनरावृत्ती करण्याची गरज”

आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---