---Advertisement---

टी20 वर्ल्डकपआधी पाकिस्तानी खेळाडूची ‘बॉलिंग ऍक्शन’ संशयास्पद! ऑस्ट्रेलियाची नाराजी, वाचा सविस्तर

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 1:21 PM
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तानने यामध्ये त्यांचा दबदबा चांगलाच निर्माण केला आहे. या मालिकेकडे आगामी टी२० विश्वचषक २०२६ची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही देशांनी त्यांचे संघ जाहीर केले असून पाकिस्तान मात्र यात खेळणार की नाही हे निश्चित नाही. असे असताना त्यांच्या एका खेळाडूच्या बॉलिंग ऍक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजी ऍक्शनवर ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने संशय निर्माण केला आहे. विशेष म्हणजे तारिकची पाकिस्तानच्या विश्वचषक संघात निवड झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या डावातील ११वे षटक तारिकने टाकले. त्या षटकाच्या चौथ्याच चेंडूत ग्रीन बाद झाला. त्याने मोठा शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावली. त्याआधी ग्रीन चांगला खेळत होता, मात्र बाद झाल्यावर त्याने परत जाताना सीमारेषेजवळ दगड फेकण्याची कृती करत आपला राग व्यक्त केला.

तारिकची गोलंदाजी पाहिली तर तो चेंडू टाकण्याआधी थोड थांबतो आणि हात खांद्याजवळ घेत चेंडू टाकतो. क्रिकेट विश्वात तशी वेगळी गोलंदाजी करणारा तो काही एकमेव खेळाडू नाही. त्याच्याआधी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारताच्या केदार जाधव यांनीही अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. तसेच आताच्या भारतीय संघात असलेल्या रियान परागचीही बॉलिंग ऍक्शन तशीच आहे.

तारिकच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले नाही. आतंरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) दोन वेळा त्याची ऍक्शन तपासली असून त्यामध्ये त्यांना काहीही चुकीचे दिसले नाही.

हा प्रकार आणखी वाढवण्याचे काम तारिकने केले. त्याने सामन्यानंतर इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये एक मुलगा रडताना दिसत असून त्याला वरती बाद झाल्यावर असे लिहिले आहे.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १९८ धावा केल्या होत्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १५.४ षटकात सर्व विकेट्स गमावत १०८ धावसंख्येवरच गारद झाला. यामुळे पाकिस्तानने ९० धावांनी हा सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---