ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी कसोटी मलिका सध्या खेळली जात आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लाहोरमध्ये खळला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने सामन्याच्या चौथ्या दिवशी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघ २७८ धावांनी आघाडीवर आहे.
सामन्याच्या पहिल्या डावात स्टीव स्मिथ (Steve Smith) अर्धशतकी खेळी करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. त्याने पहिल्या डावात १६९ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. परंतु, दुसऱ्या डावात मात्र, तो अवघ्या १७ धावांवर बाद झाला. नासिम शाहने टाकलेल्या ५९ व्या षटकात स्मिथ पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानच्या हातात झेलबाद झाला.
दुसऱ्या डावात स्मिथ स्वस्तात बाद झाला असला, तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःच्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावांमध्ये ८००० कसोटी धावा करण्याची किमया स्मिथने साधली आहे. स्मिथने त्याच्या कारकिर्दीतील ८५ व्या कसोटी सामन्यात आणि १५१ व्या डावात स्वतःच्या ८०१० धावा पूर्ण केल्या आहेत.
यापूर्वी सर्वात कमी डावांमध्ये ८००० कसोटी धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराला कसोटी कारकिर्दीत ८००० धावा करण्यासाठी १५२ वेळा खेळपट्टीवर यावे लागले होते. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे, ज्याने १५४ कसोटी डावांमध्ये ८००० धावांचा टप्पा गाठला होता.
चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू गॅरी सोबर्स आहेत, ज्यांनी १५७ कसोटी डावांमध्ये हा विक्रम केला होता. पाचव्या क्रमांकावर माजी दिग्गज आणि सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे, द्रविडने कारकिर्तीत हा टप्पा १५८ कसोटी डावांमध्ये केला होता.
पाकिस्तान विरुद्धच्या (PAK vs AUS Test Series) या कसोटी सामन्यात विचार केला, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ ३९१ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात २६८ धावा केल्या संघ सर्वबाद झाला. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघ सध्या तीन विकेट्सच्या नुकसानावर २२७ धावा केल्या आणि डाव घोषित केला. कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले असून, तिसरा सामनाही अनिर्णित होण्याच्याच मार्गावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! आयपीएलचा थरार आता मराठीतूनही मिळणार अनुभवायला
त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते