कोणताही क्रिकेट सामना सुरू असताना अनेकदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. काहीवेळी या गोष्टींमुळे सामन्यांचे आयोजन करणाऱ्या देशांचेही हसू झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे आता आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानसोबत घडले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पुन्हा एकदा फजिती झाली आहे. आता या घटनेचे फोटो सर्वत्र व्हायरल होत असून पाकिस्तानचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
खरं तर, आशिया चषक 2023 सुपर- 4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) संघात खेळला गेला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअम (Gaddafi Stadium) येथे पार पडला. या सामन्यादरम्यान गद्दाफी स्टेडिअममधील लाईट गेली. यामुळे सामना थांबवण्यात आला होता. फ्लडलाईट्स (Floodlight) गेल्यामुळे आता सोशल मीडियावर चाहते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवत आहेत.
पाकिस्तानसाठी लज्जास्पद बाब
ही घटना पाकिस्तानच्या डावातील सहाव्या षटकात घडली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर इमाम उल हक खेळपट्टीवर होते. मात्र, फ्लडलाईट्समध्ये बिघाड झाल्यामुळे सामना थांबवावा लागला. काही वेळानंतर सामना पुन्हा सुरू झाला. मात्र, लाईव्ह सामन्यात स्टेडिअममधील लाईट जाण्यामुळे पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली. सोशल मीडिया यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. नेटकरी सातत्याने कमेंट्स करत याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
More delays at the Asia Cup. This time it's not rain but due to a floodlight failure #PakvsBan #AsiaCup2023 pic.twitter.com/YONoBCgq3l
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) September 6, 2023
https://twitter.com/iamMarketWiz/status/1699417289777455562
The play stopped due to floodlight failure in Gadaffi Stadium in Lahore, Pakistan during the Asia Cup Super-4 match between Bangladesh & Pakistan.🤣
Yet shameless Pakistanis wanted to host the entire Asia Cup😆.#AsiaCup2023 #AsiaCup #Lahore #Pakistan #PakistanDefeatDay #Cricket pic.twitter.com/m8ylAVEqDB— 🇮🇳 DEBJIT 🇮🇳 (@debdutta92) September 6, 2023
They Are troling Pakistan for Floodlight failure😂#PakvsBan #AsiaCup2023 pic.twitter.com/3GcNsdCohp
— Mushtaq Ali (@Mushtaqali006) September 6, 2023
Sir, "Floodlight failure"!
New addition to #JayShah's list of why matches are shifted from #Pakistan. Courtesy @ESPNcricinfo #PakvsBan #NajamSethi pic.twitter.com/YxVkVgPrq4— Yeshwanth Kini (@YeshwanthKini) September 6, 2023
सामन्याविषयी बोलायंच झालं, तर पाकिस्तानपुढे या सामन्यात 194 धावांचे आव्हान होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 38.4 षटकात 193 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर हे आव्हान पाकिस्तानने 39.3 षटकात पार केले. यावेळी पाकिस्तानकडून इमाम उल हक याने सर्वाधिक 78 धावा केल्या. त्यात 4 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. तसेच, मोहम्मद रिझवान यानेही 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी बांगलादेशकडून तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम आणि मेहिदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (pak vs ban match floodlight failure asia cup 2023 know here)
हेही वाचाच-
सुपर फोरमध्ये हारताच शाकिबचं लक्षवेधी विधान, आपल्याच फलंदाजांना व्हिलन ठरवत म्हणाला, ‘पाकिस्तान नंबर 1…’
प्रतीक्षा संपणार! तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल खेळताना दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज