बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाचा पराभव केला. ७ गडी राखून पाकिस्तानने हा सामना आपल्या खिशात घातला. यावर प्रतिक्रिया देताना कर्णधार बाबर आझमने हा विजय पाकिस्तानी संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असल्याचे विधान केले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावरील लागोपाठ दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात बाबर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र त्यांनतर पाकिस्तानने मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याद्वारे पुनरागमन करत टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले आहे. बाबरने हा विजय अनुकूल परिस्थितीत मिळवला असला तरी दक्षिण आफ्रिकेसारख्या अव्वल संघाविरुद्ध मिळाल्याने त्याचे महत्व अधिक आहे, असे विधान केले.
“परदेशात मिळवायचे आहेत कसोटी विजय”
बाबर आझम यावेळी म्हणाला, “माझ्या मते मायदेशात तुम्ही विजय मिळवणे अपेक्षितच असते कारण परिस्थिती तुम्हाला अनुकूल असते. मात्र आम्हाला परदेशात विजय मिळवण्याची देखील गरज आहे. आम्हाला आमच्या खेळाडूंवर अधिक विश्वास दर्शविण्याची गरज आहे. एक किंवा दोन अपयशांमुळे तुम्ही त्यांना संघाबाहेर नाही काढू शकत.” यावेळी त्याने मायदेशात धावा केल्यापेक्षा परदेशात धावा केल्याने अधिक आत्मविश्वास दुणावतो, असे सांगितले.
“फलंदाजांनी केली निराशा” – क्विंटन डी कॉक
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकने पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले. त्याच्या मते फलंदाजांनी नाहक विकेट्स बहाल केल्या. त्याऐवजी त्यांनी खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्थिरावत फलंदाजी करण्याची गरज होती. मात्र पुढील सामन्यासाठी या चुकांमधून लवकरच धडे घेण्याची गरज डी कॉकने व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी.! जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भाऊ सॉरी ना..! फलंदाजाचं शतक अडवण्यासाठी पठ्ठ्याने टाकला वाईड बॉल, नंतर स्वत:च मागितली माफी
जडेजा नसल्याने आम्हाला दिलासा, माजी इंग्लिश क्रिकेटपटुचे वक्तव्य आले समोर