क्रिकेटच्या प्रत्येक काळात दोन दिग्गजांची नेहमी तुलना होत असते. यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात. अशातच पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी त्यांच्या काळातील दोन दिग्गज फलंदाजांमधील तुलनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरमध्ये कोण चांगला फलंदाज होता हे त्याने सांगितले आहे. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे त्यांच्या काळातील महान फलंदाज होते. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या कारकिर्दीत खूप धावा केल्या आणि त्यांच्यात चांगला फलंदाज कोण याची अनेकदा तुलना होत असते. अनेकवेळा अनेक दिग्गज खेळाडूंनी याबाबत आपले मत मांडले आहे. पाकिस्तानच्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना न आवडणारे विधान केले आहे.
वकार युनूस आणि वसीम अक्रम यांनी सचिन आणि ब्रायन लारा यांच्याबाबत आपलं मत मांडले आहे. दोन्ही दिग्गजांनी ब्रायन लारा सचिन तेंडुलकरपेक्षा सरस असल्याचे म्हटले आहे. अक्रमने त्याला कोणत्या फलंदाजाचे मन वाचायला आवडेल हेही सांगितले आहे. एका कार्यक्रमा दरम्यान त्याला विचारण्यात आले की तुला कोणाचे मन वाचायला आवडेल? तेव्हा तो म्हणाला, ‘ माझ्या मते, जर मला कोणाचे मन वाचायचे असेल तर तो क्रिकेटचा मोठा खेळाडू असेल. कदाचित मला ब्रायन चार्ल्स लाराचे मन वाचायला आवडेल कारण तो बाद न होण्यासाठी कसा विचार करत असे हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याची विचार करण्याची पद्धत कशी होती हे जाणून घ्यायला आवडेल.’
त्याचवेळी वकार युनूसनेही ही प्रतिक्रिया दिली आणि कोणाचे मन वाचायला आवडेल हे सांगितले. तो म्हणाला, ‘ हा खूप अवघड प्रश्न आहे. मी अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळलो आहे. माझा मित्र वसीम अक्रम येथे आहे जो स्वतः एक महान दिग्गज आहे. तो जेव्हा गोलंदाजी करायचा तेव्हा तो नेमका कसा विचार करायचा हे जाणून घ्यायचे होते, म्हणून मला त्याचे मन मन जाणून घ्यायला आवडेल. वकार युनूसने सांगितले की, ब्रायन लाराविरुद्ध गोलंदाजी करताना त्याला खूप अडचण येत होती कारण त्याला बाद करणे खूप कठीण होते.