अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शारजा येथे तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 मार्च) खेळला गेला. अफगाणिस्तानने सलग दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. मात्र, याच सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज अब्दुल्ला शफीक याच्या नावे टी20 क्रिकेटमधील एक नकोसा विक्रम जमा झाला.
कसोटी संघात शानदार कामगिरी करणाऱ्या अब्दुल्ला शफिक याला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघात संधी देण्यात आलेली. 2020 नंतर तो प्रथमच टी20 संघात खेळत होता. शारजा येथील दुसऱ्या सामन्यात फझलहक फारुखी याने त्याला पहिल्याच चेंडूवर पायचित केले. याबरोबरच त्याचा नावे टी20 क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाना विक्रम जमा झाला.
टी20 क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सामन्यात खाते न खोलणारा तो एकमेव फलंदाज बनला. मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील तो शून्यावर बाद झालेला. 2020 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपले अखेरचे दोन सामने खेळले होते. त्यावेळी देखील तो शून्यावरच बाद झालेला. त्याच्या आतापर्यंतच्या टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने पाच सामन्यात 41 धावा केल्या आहेत. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती. दुसरीकडे त्याच्या कसोटी कारकिर्दीकडे पाहिल्यास दिसून येते की, त्याने 10 सामन्यात 47.23 च्या सरासरीने 992 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्यावर सलग तीन सामन्यात खाते न खोलण्याची नामुष्की आली होती. विशेष म्हणजे सूर्या या तीनही सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झालेला.
(Pakistan Batter Abdullah Shafiq Four Consecutive Duck In T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू
नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन