---Advertisement---

टी२० विश्वचषक: तीन वेळा सेमीफायनलमध्ये हारणारा पाकिस्तान एकमेव संघ, पाहा यापूर्वी केधी केलीय ‘ही’ नकोशी कामगिरी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 2:45 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानकडून सामना हिरावून घेतला.

मॅथ्यू वेडने १७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या, तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकात २२ धावांची गरज होती, पण मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीच्या १९ व्या षटकात सलग तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तिसऱ्या वेळेस पराभूत होण्याची वेळ आली आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने आतापर्यंत पाच वेळा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. यात पाकिस्तान संघाला तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१० च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने त्यांचा पराभव केला होता. २०१२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाने पाकिस्तानचा उपांत्य सामन्यात पराभव केला होता. तर, आता २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाने पराभूत केले आहे.

त्यापूर्वी, पाकिस्तान संघाने २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती. तर २००९ च्या विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

दरम्यान गुरुवारी (११ नोव्हेंबर) पंधराव्या षटकांपर्यंत सामना ऑस्ट्रेलियाच्या आवाक्याबाहेर होता आणि पाकिस्तान सहज विजयाकडे वाटचाल करत होता. ऑस्ट्रेलियाने १५ षटकात ५ बाद ११५ धावा केल्या होत्या आणि ५ षटकात विजयासाठी ६२ धावा हव्या होत्या. परंतु, पाकिस्तानची खराब गोलंदाजी आणि स्टॉयनिस-वेडच्या वेगवान फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. अवघ्या १७ चेंडूत नाबाद ४१ धावा करणाऱ्या मॅथ्यू वेडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

मॅथ्यू वेडने स्टॉयनिससोबत सहाव्या विकेटसाठी ४१ चेंडूंत ८१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मॅथ्यू वेड म्हणाला की, तो काही काळ ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर होता, पण पुन्हा संधी मिळाल्याने आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतर खूप आनंद झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना गाठल्यानंतर क्रिकेटविश्वातून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस

सेम टू सेम! टी२० विश्वचषकाच्या दोन्ही उपांत्य सामन्यांत होते ‘हे’ साम्य

अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---