मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वविक्रम रचला आहे. पीसीबीने नुकतेच संघाची धुरा मोहम्मद रिझवानकडे सोपवली होती. जो की स्वत: रिझवान बोर्डाचा हा निर्णय योग्य असल्याचा सिध्द करत आहे, कारण त्याने प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकून आपल्या कर्णधार पदाच्या विजयी मोहिमेला सुरुवात केला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धही संघाने विजयी चव चाखली. मात्र संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांच्याच भूमीवर क्लीन स्वीप करणारा पाकिस्तान हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला हे करता आलेले नाही. मात्र 22 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने हा विक्रम केला.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 47 षटकांत 9 गडी गमावून 308 धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुबने शतक झळकावले. तर कर्णधार मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने अर्धशतके झळकावली. सलमान अली आगाने 48 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 3 बळी घेतले. मात्र, पावसामुळे हा सामना लांबला.
PAKISTAN BECOMES THE FIRST TEAM TO WHITE-WASH SOUTH AFRICA IN SOUTH AFRICA IN ODIs 🤯 pic.twitter.com/YLDZ9SNLSC
— Johns. (@CricCrazyJohns) December 23, 2024
डीएलएसमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 47 षटकांत 308 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु 42 षटकांत 271 धावा करून संघ गडगडला आणि 36 धावांच्या फरकाने सामना गमावला. अशा प्रकारे पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकून या मालिकेत यजमानांचा सफाया केला. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करता आले नव्हते, पण आता तसे झाले आहे. पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने 4 तर शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. कॉर्बिन बोसने 40 धावा केल्या.
हेही वाचा-
IND-W vs WI-W: टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्या वनडे मध्ये केला मोठा पराक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान सामना रंगणार
IND vs AUS; माजी दिग्गजाने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला! म्हणाला…