पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोघांमध्ये चट्टोग्राममध्ये कसोटी मालिका चालू आहे. ह्यामध्येच पाकिस्तानचा गोलंदाजी सल्लागार वर्नॉन फिलँडर संघाची साथ सोडून मायदेशी परतला. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएन्ट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बाकी देश विमान प्रवासावर प्रतिबंध लावत आहे. त्यामुळे फिलँडरला घरापासून दूर नाही रहायचय. त्यामुळे तो सोमवारी पाकिस्तान संघाची साथ सोडून मायदेशी परतला.
पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सोशल मीडियावर माहिती दिली होती की फिलँडर पहिला कसोटी संपल्या नंतर जाणार होता, पण प्रतिबंधामुळे तो लवकर संघाची साथ सोडणार आहे.
बांग्लादेश पहिल्या डावांत आघाडी घेऊनही पराभूत
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानने विजय मिळवला आहे, या कसोटीबद्दल सांगायचं, तर बांगलादेशने पहिल्या डावांत ३३० धावा करून पाकिस्तानला २८६ धावांवर रोखले. त्यामुळे बांगलादेशला ४४ धावांची आघाडी मिळाली. परंतु, बांगलादेश दुसऱ्या डावांत चांगली सुरुवात नाही करू शकले. त्यांनी सर्वबाद १५७ धावाच केल्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर केवळ २०२ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान पाकिस्तानने तब्बल ८ विकेट्स राखून पार केले आणि सामना जिंकला.
नेदरलँड्स सोबत वनडे मालिका रद्द
कोविडच्या नव्या व्हेरिएन्टने आफ्रिकेतल्या क्रिकेटवर फरक पडला. ह्यामुळेच दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्स सोबतची वनडे मालिका रद्द केली. सोबतच आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे पात्रता सामने देखील रद्द केले.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोरोनाचं संकट
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरसुद्धा कोरोनाचं सावट आहे. भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघासोबत चार दिवसीय सामने तेथे खेळत आहे. तर मुख्य संघ पुढच्या महिन्यात ३ कसोटी, ३ वनडे, ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!
“मुंबई कसोटीसाठी कोणीही पुनरागमन केलं, तरी श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार नाही, दुसरं कोणीतरी होईल”
IPL Retention: कोणाच्या ताफ्यात कोण राहिलं कायम अन् कोणाच्या खिशात उरली किती रक्कम? वाचा एका क्लिकवर