पुढच्या वर्षी होणारा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. भारतीय संघ यजमानपद भूषवणाऱ्या या विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभाग घेईलच याविषयी सध्या कसलीही खात्री देता येणार नाही. पाकिस्तानव्यतिरिक्त श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांच्या सहभागाविषयी देखील शंका आहे. आयसीसीच्या नियमांनुसार क्रिकेट विश्वचषक सुपर लीगमध्ये सुरुवातीच्या सात संघांमध्ये ज्यांचे नाव नसेल, त्या संघांनाच क्वालीफायर सामने खेळता येतात.
नियमांनुसार सुपर लीगमध्ये जे संघ पहिल्या सातमध्ये सहभागी असतात आणि जो संघ यजमान असतो, त्यांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळते. राहिलेल्या पाच संघांना असोसिएट देशांसोबत क्वालीफायर फेरी खेळावी लागले. क्वालिफायर फेरीत जे दोन संघ सर्वात वरती असतील, त्यांना विश्वचषकासाठी संधी मिळते. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुपर लीगमध्ये एकूण १३ संघ सहभागी असतात.
सध्या न्यूझीलंड पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ सुपर लीगच्या सुरुवातीच्या सात संघांमध्ये सहभागी नाहीत. जर आगामी सामन्यांमध्ये या संघांनी चांगले प्रदर्शन केले नाही, तर त्यांना असोसिएट देशांसोबत क्वालिफायर फेरी खेळावी लागू शकते. क्वालिफायर फेरीत जे दोन संघ सर्वात्तम प्रदर्शन करतील, त्यांची विश्वचषकातील जागा पक्की असेल. जर हे तिन्ही संघ क्वालिफायर फेरीमध्ये खेळले, तर कोणतातरी एक संघ स्पर्धेतून बाहेर होणे निश्चित आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघाने जर चांगले प्रदर्शन केले, तर पाकिस्तान संघ विश्वचषकाला मुकू शकतो. पाकिस्तानच्या तुलनेत हे दोन संघ बलाढ्य दिसतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मलिंगा-बुमराहलाही मागे टाकेल अशी गोलंदाजी ऍक्शन! बॉलरचा व्हिडिओ पाहून मायकल वॉनही चकित
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?