पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 डिसेंबरदरम्यान खेळला गेला. रावळपिंडी कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पाडण्यात आला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजीत आणि नंतर शेवटच्या डावात गोलंदाजीने पाकिस्तानच्या नाकी नऊ आणल्या. रावळपिंडीच्या या मैदानाच्या खेळपट्टीवरही ताशेरे ओढले गेले. या खेळपट्टीमुळे गोलंदाजांना मदत मिळाली नाही आणि फलंदाजांनाच जास्त फायदा झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने यावर आपले मत मांडले आहे.
सोमवारी (दि. 05 डिसेंबर) बाबर आझम (Babar Azam) म्हणाला की, त्याला अपेक्षेप्रमाणे खेळपट्टी मिळाली नाही. इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर तो म्हणाला की, रावळपिंडी क्रिकेट मैदानाच्या पीच क्यूरेटर (Pitch Curator) त्याचे मत जाणून घेतले होते, परंतु त्याला तशाप्रकारची खेळपट्टी मिळाली नाही, जशी त्याला पाहिजे होती.
या सामन्यानंतर बाबर म्हणाला की, “खेळपट्टी तयार करण्यात माझे मत घेण्यात आले होते. आम्ही स्पष्टही केले होते की, आम्हाला कशाप्रकारची खेळपट्टी हवी आहे. मात्र, वातावरण असो किंवा इतर काही कारण आम्हाला तशी खेळपट्टी मिळाली नाही, जशी आम्हाला हवी होती. आम्हाला अशी खेळपट्टी हवी होती, ज्यामध्ये फिरकीपटूंसाठी थोडे वळण मिळेल.”
इंग्लंडने साहसी निर्णय घेत दुसरा डाव घोषित केला आणि पाकिस्तानपुढे 100 षटकात 343 धावा करण्याचे आव्हान ठेवले. पाकिस्तान संघ सामन्याच्या पाचव्या दिवशी 268 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या दिवशी एकेवेळी पाकिस्तान संघ मजबूत स्थितीत वाटत होता. मात्र, रॉबिन्सनच्या रिव्हर्स स्विंगने इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
रावळपिंडीची खेळपट्टी खूपच सपाट होती आणि इंग्लंडने पहिल्या दिवशी 500 हून अधिक धावा चोपल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या दोन डावांमध्ये तब्बल 7 शतके ठोकली गेली होती.
पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना
इंग्लंड संघाने कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबरपासून मुलतान क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (pakistan captain babar azam said we did not get the pitch like we wanted)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या मुलीला मिळाली तिची हुबेहूब कॉपी; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘आणखी पाच शोधायची गरज’
जेम्स अँडरसनकडून अनिल कुंबळेंना धक्का! दिग्गजाने रावलपिंडी कसोटीत रचला इतिहास