पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान आहे. वास्तविक, पाकिस्तान दीर्घ काळानंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मात्र याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाची वाईट अवस्था जगापासून लपलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पैसा कमावण्यात व्यस्त आहे. मात्र, सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर परिणाम होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा करण्यात व्यस्त आहे.
पीसीबीने आपल्या ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियमचे नाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गद्दाफी स्टेडियमच्या नामकरणाचे हक्क एका खासगी बँकेला 5 वर्षांसाठी विकले आहेत. हा करार अंदाजे 1 अब्ज पाकिस्तानी रुपयांमध्ये झाला आहे. मात्र या कराराची अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही. पण आता लाहोरचे गद्दाफी स्टेडियमही कराचीच्या नॅशनल स्टेडियमप्रमाणे बँकेच्या नावाने ओळखले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उल्लेखनीय आहे की लाहोरच्या स्टेडियमचे नाव गद्दाफी स्टेडियम 1974 मध्ये ठेवण्यात आले होते. हे नाव लिबियाचे नेते मुअम्मर गद्दाफी यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. यापूर्वी पाकिस्तानमधील स्टेडियमचे नाव देण्याचे हक्क विकण्याची परंपरा पीसीबीचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार रमीझ राजा यांनी सुरू केली होती. राजा यांच्या कार्यकाळातच 2021 मध्ये कराची स्टेडियमचा करार पूर्ण झाला होता. त्यानंतर कराचीचे प्रसिद्ध नॅशनल स्टेडियम आता नॅशनल बँक क्रिकेट मैदान म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा-
26 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास; केवळ 5 कसोटी सामन्यातच केली करामत
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 गोलंदाज; यादीत फक्त दोनच भारतीय
कोण आहे सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा? संघर्षाची कहाणी तुम्हाला देखील रडवेल