पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्यांच्या खेळाडूंना आगामी बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी युनाईटेड अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल टी२० लीगमध्येही (आयएलटी) खेळाडूंना खेळण्यास मनाई केली आहे. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने एक मोठे कारणही दिले आहे.
घरच्या मैदानावर पुढे मोठ्या प्रमाणात सामने खेळले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जाणार असल्याने आम्ही खेळाडूंना टी२० लीगमध्ये खेळण्यास होकार दिला नाही, असे कारण बोर्डने सांगितले आहे. तर करार न केलेल्या खेळाडूंना का नाही म्हटले याचे कारण अजून पुढे आलेले नाही.
बीबीएलच्या हंगामासाठी सुरू होणाऱ्या लिलावासाठी ड्रॉफ्ट केलेल्या ९८ विदेशी खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश नव्हता. तर शेवटच्या क्षणापर्यंत पाकिस्तानच्या खेळाडूंचा सामवेश केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आयएलटी२०साठी आतापर्यत अधिकृतरित्या नावे जाहीर केली गेलेली नाहीत.
पीसीबीने अशा टी२० लीगमध्ये खेळाडूंना खेळण्याची परवाणगी न देणे हे काही पहिल्यांदाच नाही घडत आहे. त्यांनी २०१९मध्येही असेच केले होते, तेव्हा खेळाडूंनी आंदोलन केले होते. तसेच बोर्डने खेळाडूंसोबत विदेशी लीगमध्ये खेळण्याबाबत करार केला आहे. ज्यामध्ये खेळाडूंनी विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी बोर्डासोबत अनाधिकृतपणे ‘पीएसएल प्लस वन’ नियमाचा करार केला होता. मात्र या नियमाचे पालन होताना दिसत नाहीये.
पुढच्या वर्षीपासून आयएलटी२० या लीग व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या लीगचा थरार सुरू होणार आहे. सध्याच्या पाकिस्तान संघातील खेळाडूंची क्षमता, गुण पाहिले तर त्या खेळाडूंची असा लीगमध्ये खेळण्याची मागणी करणे बरोबरच आहे. पण पाकिस्तानच्या नियमानुसार नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, खेळाडूंना पहिल्या ड्राफ्टमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पीसीबीची परवाणगी घेणे आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर गेलेल्या कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण! म्हणाला, ‘सध्या मी…’
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ – सुनील छेत्री
भारतासाठी मध्यरात्री ‘सुर्या’ चमकला! अर्धशतक झळकावल्यानं संघात ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात