---Advertisement---

भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनामुळे केवळ भारताच नाही, तर पाकिस्तान क्रिकेटविश्वही हळहळले, पाहा खेळाडूंच्या प्रतिक्रिया

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 2:11 PM
Lata-Mangeshkar-Pakistan -Cricketers
---Advertisement---

रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महान गायिका लता मंगेशकर यांचे मुंंबईत निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच देशातीलच नाही, जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अगदी पाकिस्तानच्या क्रिकेटविश्वातून देखील भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांनी ट्वीट केले की, ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने उपखंडाने एक खऱ्याखुऱ्या महान गायिकेला गमावले आहे. जगभरात त्यांच्या गाण्यांनी सर्वांना आनंद मिळाला आहे.’

तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने देखील ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले की, ‘एका सुवर्णयुगाचा अंत. त्यांचा जादुई आवाज आणि वारसा जगभरातील कोट्यावधी लोकांच्या मनात कायम राहिल. एक अतुलनीय व्यक्तीमत्त्व. लता मंगेशकरांच्या आत्म्यास शांती लाभो.’

https://twitter.com/babarazam258/status/1490252910579621888

तसेच मोहम्मद हाफिजने ‘मेरी आवाजही मेरी पेहचान है’ असं ट्वीट केले आहे.

https://twitter.com/MHafeez22/status/1490237978349867011

पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शोएब मलिकने ट्वीट केले की, ‘आम्ही मॅडम नूर जहाँ आणि लता मंगेशकरजी यांची मधूर गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. जगाने एक मौल्यवान व्यक्तीमत्त्व गमावले आहे. प्रत्येक संगीत प्रेमीला लता मंगेशकरजी यांची कमी जाणवेल.’

https://twitter.com/realshoaibmalik/status/1490288104850300931

याबरोबर पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी ट्वीट केले की, ‘लता मंगेशकर दयाळूपणा, साधेपणा आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण आहेत. त्या सर्वांसाठी एक शिकवण होत्या. किशोर कुमाप यांच्या निधनानंतर आता त्यांच्याही जाण्याने मला संगीत क्षेत्रापासून तोडले आहे.’

https://twitter.com/iramizraja/status/1490231308202942467

याव्यतिरिक्त देखील अनेकांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.

https://twitter.com/waqyounis99/status/1490236968571125761

https://twitter.com/RealHa55an/status/1490290026554482691

भारतीय संघाने वाहिली श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट संघाने देखील लता मंगेशकरांना रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यादरम्यान श्रद्धांजली वाहिली. भारतीय संघाने सामन्यापूर्वी एक मिनिट मौन धारण केले होते, तसेच संघातील खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.

https://twitter.com/BCCI/status/1490247619075252228

लता मंगेशकर या एक क्रिकेटप्रेमी म्हणून देखील सर्वांना माहित होत्या. त्यांनी अनेकदा भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणारे ट्वीट्स केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

असा आहे अंडर १९ विश्वविजेत्या कर्णधाराचा भविष्यातील मास्टर प्लॅन, स्वतः केला खुलासा

गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ

…नाहीतर दिल्ली कसोटीत १० विकेट्स कुंबळेसाठी ठरलं असतं स्वप्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---