पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या सेंट्रल कॅन्ट्रॅक्टमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार खेळाडूंना लाहोर कॅम्पमध्ये हे नवीन कॅन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत. काही खेळाडूंना यावर लगेच स्वाक्षरी केली, तर काहींनी वेळ मागितला होता. माहितीनुसार आता या सर्वांनी कॅन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली आहे. नवीन कॅन्ट्रॅक्टमुळे खेळाडूंना मिळमाऱ्या वेतनामध्ये वाढ होईल. नवीन कॅन्ट्रॅक्ट १ जुलैपासून लागू होईल.
पीसीबीने यापूर्वी जून महिन्यात खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनात वाढ होणार असल्याचे सांगितले होते. आता बोर्डाने याविषयी निर्णय घेतला आहे. पाकिस्तानीच्या एका खेळाडूनला आता एक कसोटी सामना खेळण्यासाठी ७,६२,३०० ते ८,३८,००० पाकिस्तानी रुपये मिळणार आहेत. एका एकदिवसीय सामन्यासाठी खेळाडूंना ५,१५,००० पाकिस्तानी रुपये मॅच फीस दिली जाईल, यापूर्वी एकदिवसीय सामन्यासाठी खेळाडूंना ४,६८,८१५ रुपये दिले जात होते. टी-२० क्रिकेटचा जर विचार केला, तर मागच्या हंगामापर्यंत खेळाडूंना ३,३८,२५० रुपये मॅच फीस दिली जात होती, जी आता वाढवून ३,७२,०७५ केली आहे.
भारतीय रुपयाच्या हिशोबात एका पाकिस्तानी रुपया ०.३७ भारतीय पैशांच्या बरोबर असतो. म्हणजेच पाकिस्तानी खेळाडूंना कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय हिशोबाने ३ लाख रुपये मिळतील. एकदिवसीय सामन्यासाठी १.९ लाख आणि टी-२० सामन्यासाठी १.३८ लाख रुपये मिळतील. खेळाडूंना प्रत्येक महिन्याला रिटेंशन फीस देखील मिळणार आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेलाडूंसाठी ३.८८ लाख रुपये रिटेंशन फीस असेल. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंसाठी ही फीस भारतीय हिशोबाने ३.५ लाख रुपये असेल. एक वर्ष कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची रिटेंशन फिस जवळपास ४७ लाख रुपये होईल.
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची तुलना केली, तर मोठी तफावत पाहायला मिळते. बीसीसीआय त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंना रिटेन करण्यासाठी वर्षीक ७ करोड रुपये खर्च करते. खेळाडूंना ४ ग्रुपमध्ये विभागले गेलेले असते. सर्वात कमी रिटेंशन फीस १ करोड रुपये आहे. भारतीय खेळाडूंना कसोटी सामना खेळण्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख, तर टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. पाकिस्तानच्या खेळाडूंना ५ कसोटी सामन्यांनंतर जितके पैसे मिळतात, तेवढे पैसे भारतीय खेळाडूला एक सामना खेळल्यानंतरच मिळू शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
अबकी बार, पाकिस्तान की हार! ऑसी दिग्गजाच्या मते आशिया चषकातील महामुकाबला भारतच जिंकणार
इंग्लंडमध्ये पुजारा कडाडला! १३५ च्या स्ट्राईक रेटने ठोकले झंझावाती शतक