आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर 4 सामने कोलंब येथून हंबनटोटा येथे हलवण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हंबनटोटा येथे होईल. मात्र, 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग दिसून येत आहेत. कारण पाकिस्तान संघाने या मैदानावर खेळण्यास नकार दिल्याचे समजते.
उभय संघातील साखळी फेरीतील सामना कॅण्डी येथे दोन सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. मात्र, पावसामुळे या सामन्यात केवळ भारतीय संघ फलंदाजी करू शकला. त्याच कारणाने या सामन्याचा निकाल लागला नाही व दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. अशात सर्व क्रिकेटप्रेमींची नजर 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यावर लागलेली. मात्र, पाकिस्तान संघ या सामन्यासाठी अनुकूल नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
सुरुवातीला पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान होते. मात्र, भारतीय संघाने विरोध केल्यामुळे हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा श्रीलंका व पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात तर नऊ सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. मात्र श्रीलंकेत पावसाळ्याचे दिवस असल्याने, सुपर फोर सामन्यात व्यत्यय येऊ नये म्हणून श्रीलंकेच्या दुसऱ्या भागातील हंबनटोटा येथे हे सामने खेळवण्याचा विचार आयोजकांनी केला आहे. मात्र, असे स्थळांची अदलाबदली केल्याने पाकिस्तान संघ हे सामने खेळण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसते.
अ गटातून सुपर 4 सामन्यांसाठी भारत व पाकिस्तान हे पात्र ठरले आहेत. तर दुसऱ्या गटातील स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसून, श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर ही समीकरणे समोर येतील.
(Pakistan Refuse To Play In Hambantota In Asia Cup Super 4)
महत्वाच्या बातम्या –
अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील शिवम पडिया, प्रद्युम्न ताताचर यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
शतक हुकले आणि चाहत्यांचे हार्टब्रेक! यष्टीरक्षक फलंदाज आपल्याच चुकीने नर्व्हस नाइंटीवर धावबाद । VIDEO