भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात आमने-सामने होते. मात्र, पावसामुळे पूर्ण सामना होऊ शकला नाही. आता आशिया चषक 2023 सुपर-4 फेरीतील तिसरा सामना 10 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान संघात होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा या स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने मोठे विधान केले आहे. भारताविरुद्ध आमचे 100 टक्के योगदान देण्यासाठी तयार असल्याचे तो म्हणाला.
आशिया चषक 2023 सुपर-4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. हा सामना पाकिस्तान संघाने 7 विकेट्सने जिंकला. वनडे क्रिकेट प्रकारातील हा कमी धावसंख्येचा सामना होता. बांगलादेश संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 193 धावांवर संपुष्टात आला होता. हे आव्हान पाकिस्तानने 39.3 षटकात 3 विकेट्स गमावत 194 धावा करून पार केले.
बाबर आझम (Babar Azam) याने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर म्हटले, “पूर्ण श्रेय आमच्या वेगवान गोलंदाजांना जाते. आधी शाहीन आणि आता हॅरिस. आम्ही फहीम अश्रफ याला निवडण्याची योजना आखली. कारण, या खेळपट्टीवर खूप गवत होते, जे आम्हाला आवडले. जेव्हाही आम्ही या मैदानावर खेळतो, तेव्हा आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो. मला आशा आहे, की त्यांनी सामन्याचा आनंद लुटला असेल.”
भारताविरुद्धच्या पुढील सामन्याविषयी बोलताना बाबर म्हणाला, “या विजयासह आम्ही पुढील सामन्यांमध्ये आत्मविश्वासाने भरलेलो असू. आम्ही नेहमीच मोठ्या सामन्यांसाठी तयार असतो. आम्ही भारताविरुद्धच्या सामन्यात आमचे 100 टक्के देण्यासाठी तयार आहोत.”
खरं तर, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने-सामने असणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले होते. मात्र, आता चाहत्यांना पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये हा महामुकाबला पाहायला मिळेल. (pakistan skipper babar azam on india vs pakistan said this know here)
हेही वाचाच-
प्रतीक्षा संपणार! तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल खेळताना दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! जय शाहांकडे मागितले ‘ते’ पैसे, PCB अध्यक्षाची मेलद्वारे मागणी