पाकिस्तानात होणारी काश्मीर प्रीमियर लिग सुरु होण्याआधीच वादात सापडली आहे. 6 ऑगस्टला सुरू होणाऱ्या या टी20 स्पर्धेला मान्यता न मिळण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहिले आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार ही स्पर्धा काश्मीर प्रांतात न घेण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीला हे पत्र लिहिले आहे.
याआधी शनिवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयने त्यांच्या अंतर्गत बाबित ढवळाढवळ केल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. भारतीय बोर्डाने काही खेळाडूंना ही लीग न खेळण्यासाठी दबाव टाकला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासाठी बीसीसीआय आयसीसीच्या काही सदस्यांच्या संपर्कात होते, असा दावाही त्यांनी केला होता.
ही स्पर्धा खेळण्याची शक्यता असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षल गिब्जने ट्विट करत म्हटले होते की, “मला धमकावण्यात आले आहे. जर मी ही स्पर्धा खेळलो तर क्रिकेटसंदर्भातील कुठल्याही कामासाठी मला भारतात प्रवेश मिळणार नाही.”
आता असे वृत्त येत आहे की, बीसीसीआयने आयसीसी संपर्क साधला आहे. त्यांनी आयसीसीकडे तक्रार करत म्हटले आहे की, दोन देशांच्या विवादित सीमाभागात स्पर्धा घेणे योग्य नाही. मग अशा प्रदेशात केपीएलसारखी स्पर्धा भरवणे उचित आहे का? असा प्रश्न बीसीसीआयने आयसीसीला विचारला आहे.
काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील विवादित मुद्दा आहे. पाकिस्तान काश्मीरवर आपला अधिकार सांगत आले आहे. म्हणून दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेले आहेत. गेल्या काही वर्षात एकही भारत-पाकिस्तान मालिका झालेली नाही. इतकच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याचीही परवानगी नाही.
6 ऑगस्टपासून केपीएलच्या पहिल्या हंगामाचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशानसारखे मोठे खेळाडू खेळण्याची शक्यता आहे. या लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टाइगर्स, रावलकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपुर रॉयल्स आणि कोटली लायंस हे 6 संघ भाग घेणार आहेत. तसेच शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, कामरान अकमल आणि शादाब खान केपीएलच्या वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करतांना दिसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाने ३ वर्षांपुर्वी खेळला होता नॉटिंघममध्ये शेवटचा सामना, ‘असा’ लागला होता निकाल
भारतीय गोलंदाजांचा घाम काढणारा इंग्लंडला ‘हा’ शिलेदार पहिल्या कसोटीला मुकणार?
प्लेइंग इलेव्हनबद्दल वसीम जाफरचा कोहली अन् शास्त्रींना ‘गुप्त संदेश’, पाहा तुम्हाला समजतोय का?