वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. पाकिस्तान संघासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने खास पराक्रम केला आहे. त्याने या सामन्यात वनडे कारकीर्दीतील मैलाचा दगड पार केला आहे.
पाकिस्तान संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने 5 धावा करताच त्याच्या नावावर वनडेत 2000 धावांची नोंद झाली. ही कामगिरी त्याने 65व्या डावात पूर्ण केली. रिझवान या सामन्यात चांगल्या लयीत दिसला होता. त्याने सामन्यात चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने या सामन्यात 27 चेंडूंचा सामना करताना 31 धावा केल्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडला. मात्र, त्याच्यासाठी चांगली बाब ही राहिली की, त्याने या डावात वनडे कारकीर्दीतील 2 हजार धावांचा टप्पा पार केला.
रिझवानने हा पराक्रम करताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्याचे अभिनंदन केले. त्यांनी फोटो आणि टाळ्या वाजवण्याच्या इमोजीचा वापर करत लिहिले की, “मोहम्मद रिझवानने 65 डावात वनडेतील 2000 धावांचा टप्पा पार केला.” आता या पोस्टवर कमेंट्स करत चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.
.@iMRizwanPak completes his 2️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs in 65 innings 👏#PAKvSA | #DattKePakistani | #CWC23 pic.twitter.com/ix1QEHpp3T
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2023
रिझवान हा पाकिस्तान संघाचा विश्वासू फलंदाज मानला जातो. त्याने आतापर्यंत कारकीर्दीत पाकिस्तानसाठी अनेक शानदार खेळी करून संघाला विजयी केले आहे. त्याची वनडे कारकीर्द पाहिली, तर त्याने आतापर्यंत 71 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2026 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा पाऊस पडला आहे. 131 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
रिझवानची विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने 6 डावात 66.60च्या सरासरीने 333 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. (pakistan wicketkeeper batsman mohammad rizwan completes his 2000 odi runs during pak vs sa cwc 2023)
हेही वाचा-
आता बाबरला रोखणं कठीण! विश्वचषकातील तिसरं अर्धशतक ठोकत दिले फॉर्मात परतल्याचे संकेत
‘एकटा कर्णधार विश्वचषक जिंकू शकला असता, तर…’, गंभीरचा पुन्हा एकदा धोनीवर निशाणा, पण सोशल मीडियावर ट्रोल