टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याविषयी फक्त भारत आणि पाकिस्तान देशातीलच नाही, तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेमागील कारण म्हणजे, हे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकातच एकमेकांचा सामना करतात. यापूर्वी ते मागील वर्षी 2021च्या विश्वचषकात आमने-सामने आले होते, या सामन्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता भारत-पाकिस्तान सामन्याविषयी पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हिरा मानी हिला विचारले. यावर ती काय म्हणाली, चला जाणून घेऊया…
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या सामन्याच्या क्रेझविषयी अभिनेत्री हिरा मानी (Hira Mani) हिला माध्यमांनी विचारले असता तिने वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, “भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रेझ अशी आहे की, जर मी मरत जरी असले, तरी पती आधी संपूर्ण सामना पाही आणि नंतर दफन करेल.” अभिनेत्रीच्या या वक्तव्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, क्रिकेट चाहते कशाप्रकारे या कट्टर प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्यासाठी उत्सुक असतात.
या सामन्याविषयी जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मतेही कदाचित अभिनेत्रीच्या या वक्तव्याशी मिळतीजुळती असू शकतात. एकीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ आव्हान देण्यासाठी तयार आहे, तर दुसरीकडे, बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही सज्ज आहे. मागील वेळी असे पाहायला मिळाले होते की, आशिया चषकावेळी अनेक चाहते फक्त विराट आणि रोहितला भेटण्यासाठी यूएईला पोहोचले होते.
आता पुन्हा एकदा 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडिअममध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असतील, तेव्हा चाहत्यांना तोच रोमांच पाहायला मिळेल. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, केएल राहुल, मोहम्मद शमी यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू मैदानावर घाम गाळतायेत, तर पाकिस्तानी क्रिकेट संघही जोरदार तयारी करत आहे. या सामन्याविषयी खास बाब अशी की, फक्त 10 मिनिटांच्या आतच या सामन्याची 90 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. या सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीवीरांनो सावधान! आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला केलंय जखमी, माजी प्रशिक्षक म्हणतोय…
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नींचे गांगुलीबद्दल मोठे विधान; म्हणाले, ‘त्याने भारतीय क्रिकेटचा…’