भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्विंगसाठी प्रसिद्ध असलेला प्रवीण कुमार याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गोलंदाज रिव्हर्स स्विंग करण्यासाठी चेंडूशी छेडछाड करतात. प्रवीण कुमार यानी पाकिस्तानी खेळाडूंवर आणखी एक मोठा आरोप केला की ते दिखावा खूप जास्त करतात.
प्रवीण कुमार (Praveen Kumar) यानेही आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने खेळले. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो पाकिस्तानी खेळाडूंवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहे. ललनटॉपशी बोलताना प्रवीण कुमार म्हणाला, “प्रत्येकजण चेंडूशी छेडछाड करतो पण पाकिस्तानी गोलंदाज थोडे जास्तच करायचे. आता ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत पण पूर्वी सगळेच असे करायचे. पाकिस्तानी गोलंदाज एका बाजूने चेंडू स्क्रॅच करायचे. मात्र, तुमच्याकडे कौशल्य असेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मी बॉल स्क्रॅच करून एखाद्याला दिला तर त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग घेण्याइतके कौशल्य असावे.” (pakistani bowlers used to do a ball tampering reveals former pacer praveen kumar)
Praveen Kumar splitting facts. pic.twitter.com/dA56zWEZ2B
— Pawan Shukla (@Shukla9_) January 7, 2024
प्रवीण कुमार याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत केली होती. प्रवीणने यापूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याला कसोटी सामन्यांमध्येही खेळण्याची संधी मिळाली. प्रवीण कुमार भारताकडून मर्यादित षटकांमध्ये दीर्घकाळ खेळला असला तरी कसोटीत त्याला केवळ 6 सामने खेळता आले.
प्रवीण कुमारच्या नावावर 6 कसोटी सामन्यात 27 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने 68 एकदिवसीय सामन्यात 77 आणि 10 टी20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. प्रवीणकडे चेंडू स्विंग करण्याची कला होती पण दुखापतीमुळे त्याची कारकीर्द तितकीशी यशस्वी झाली नाही आणि तो 2018 मध्ये निवृत्त झाला. (Ball Tampering Before everyone used to gnaw balls Confession of India’s legendary bowler)
हेही वाचा
Kieron Pollard: मुंबईच्या पोलार्डची वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट, पाहा कुणावर साधलाय निशाणा
David Warner Farewell: फेअरवेल मॅचनंतर वॅार्नरच्या मुलींमध्ये भांडण, पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ