पाकिस्तानचा युवा सलामीवीर इमाम उल हक पदार्पणापासून देशासाठी दमदार कामगिरी करतो आहे. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्याने चांगली कामगिरी करत संघातील स्थान पक्के केले आहे. तो पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज इंझमाम उल हकचा पुतण्या आहे.
मात्र आता एका वेगळ्याच कारणाने इमाम चर्चेत आला आहे. ईदच्या शुभेच्छा त्याने शेअर केलेले भन्नाट मिम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. हे मिम अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.
अविवाहित खेळाडूंची केली गंमत
त्याचे झाले असे की, १४ मे म्हणजेच काल ईद साजरी करण्यात आली. या निमित्ताने अनेक खेळाडूंनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. इमाम उल हकने देखील आपला फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र संघ सहकार्यांनी टाकलेले फोटो पाहून त्याला गंमत करायची लहर आली.
इमामचे पाकिस्तानी संघातील संघ सहकारी असलेल्या हसन अली, शोएब मलिक, वहाब रियाझ यांनी आपापल्या पत्नीसह फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र पाकिस्तानी संघातील इमाम उल हक, बाबर आझम, शादाब खान हे खेळाडू अविवाहित आहेत. त्यामुळे पत्नीसह फोटो पोस्ट केलेले पाहून त्यांच्या मनात ईर्षा उत्पन्न होते आहे, अशा अर्थाचे मिम इमामने शेअर केले. यात त्याने ‘मिर्जापुर’ वेब सिरीज मधील गुड्डू भैय्या या पात्राचा ‘जिंदगी हो तो ऐसी’ हा संवाद देखील वापरला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने हे मिम शेअर केले.
Imam ul Haq insta story 😂😂 pic.twitter.com/gnYnFkHgqq
— Labeed (@Labeed_Siddiqui) May 14, 2021
इमाम उल हकची कारकीर्द
इमाम उल हकने आत्तापर्यंत पाकिस्तानकडून ११ कसोटी, ४३ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने २५.५३ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. तर टी२० सामन्यात १०.५ च्या सरासरीने २१ धावा केल्या आहेत. कसोटी आणि टी२० सामन्यात तो छाप पाडू शकला नसला तरी वनडे सामन्यात त्याने संघात आपले स्थान पक्के केले आहे. आत्तापर्यंत ४३ वनडे सामन्यात त्याने ५१.७४ च्या सरासरीने १९६६ धावा केल्या आहेत. यात ७ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत