पुणे (16 मार्च 2024)- आजचा शेवटचा सामना पालघर विरुद्ध लातूर यांच्यात झाला. सामन्याचा सुरुवातीलाच पालघर संघाने आक्रमक खेळ केला. पालघरच्या प्रतीक जाधव ने सलग चढाया करत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. सामन्याच्या 5 व्या मिनिटाला पालघर संघाने लातूर संघावर लोन पडत 10-00 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर मात्र लातूरच्या प्रदिप आकांगिरे ने चढाईत गुण मिळवले.
प्रदिप आकांगिरे व सोहेल शेख ने चतुरस्त्र चढाया करत मध्यंतराला 5 मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाला ऑल आऊट करत पिछाडी कमी केली. 15-14 अशी नाममात्र 1 गुणांची आघाडी होती. मध्यांतरापुर्वी प्रदिप आकांगिरे ने सुपर टेन पूर्ण करत लातूर संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला 19-16 अशी लातूर संघाने आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर पालघरच्या प्रतिक जाधव ने सुपर टेन पूर्ण केला.
पालघर संघाने लातूर संघाला दुसऱ्यांदा ऑल आऊट करत 26-19 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर पालघर संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामना 38-26 असा जिंकला. पालघर कडून प्रतिक जाधव ने सर्वाधिक 15 गुण मिळवले. तर अभिनय सिंग ने हाय फाय पूर्ण केला. तर लातुर कडून प्रदिप आकांगिरे ने सर्वाधिक 13 गुण मिळवले. (Palghar team beat Latur team, Palghar team is third in the points table)
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- अभिनय सिंग, पालघर
कबड्डी का कमाल – प्रदिप आकांगिरे, लातूर
महत्वाच्या बातम्या –
केकेआरमध्ये पुन्हा येण्यासाठी शाहरुखकडून मिळाला कोरा चेक? वाचा गौतम गंभीरने का सोडली लखनऊची साथ
कोल्हापूर संघाने नंदुरबार संघाचा विजयी रथ रोखला