पुणे (19 मार्च 2024)- आज संध्याकाळ सत्रात पालघर विरुद्ध बीड यांच्या लढत झाली. पालघर ब गटात चौथ्या स्थानी होता तर बीड संघ अ गटात दुसऱ्या स्थानी होता. सामन्याच्या पहिल्या चढाईत बीडच्या शंकर मेघाने ने गुण मिळवला तर पालघरच्या पहिल्या चढाईत प्रतिक जाधव ने गुण मिळवत आपल्या संघाचा खात उघडला. पालघरच्या यश निंबाळकर व प्रतिक जाधव ने चतुरस्र चढाया करत संघाला आघाडी मिळवून दिली. बीड कडून शंकर मेघाने ने चढाया करत गुण मिळवले.
पालघरच्या यश निंबाळकर ने जोरदार खेळ करत बीड संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. अभिनय सिंग व प्रेम मंडळ यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. मध्यंतराला पालघर संघाने 20-10 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर यश निंबाळकर ने सुपर टेन पूर्ण करत संघाची आघाडी वाढवली. अभिनय सिंग ने हाय फाय पूर्ण केला.
उत्तरार्धात पालघर संघाने आणखी एकदा बीड संघाला ऑल आऊट केले. पालघर संघाने 38-23 अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवत प्रमोशन फेरीत जोरदार सुरुवात केली. पालघरच्या यश निंबाळकर ने चढाईत सर्वाधिक 15 गुण मिळवले. तर प्रतिक जाधव ने चढाईत 5 गुण मिळवले. अभिनय सिंग व प्रेम मंडळ यांनी बचावफळीत उत्कृष्ट खेळ केला. अभिनय सिंग ने पकडीत 5 तर प्रेम मंडळ ने 4 गुण मिळवले. बीड कडून शंकर मेघाने ने 14 गुण मिळवले. (Palghar team defeated Beed team in the promotion round)
बेस्ट रेडर- प्रेम मंडळ, पालघर
बेस्ट डिफेंडर- अभिनय सिंग, पालघर
कबड्डी का कमाल – रियाज शेख, बीड
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाची जोरदार सुरुवात
चाहत्यांचा हर्टब्रेक! आयपीएल 17व्या हंगामाबाबत सूर्यकुमारचे संकेत, नक्की ‘या’ पोस्टमागं दडलंय काय?